डॉक्टर नवऱ्याने बायकोला लावला कोट्यवधीचा चुना, कशी केली फसवणूक?; वाचाल तर थक्क व्हाल

नर्सिंग होमचा मालक असलेल्या एका डॉक्टरने गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त राहत असलेल्या त्याच्या पत्नीला कोट्यवधी रुपयांना फसवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (delhi Husband takes loan from wife fake documents, arrested)

डॉक्टर नवऱ्याने बायकोला लावला कोट्यवधीचा चुना, कशी केली फसवणूक?; वाचाल तर थक्क व्हाल
सूनेसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून बापाने केली मुलाची हत्या
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 8:08 PM

नवी दिल्ली: नर्सिंग होमचा मालक असलेल्या एका डॉक्टरने गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त राहत असलेल्या त्याच्या पत्नीला कोट्यवधी रुपयांना फसवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या डॉक्टरने पत्नीला सुमारे पावणे तीन कोटी रुपयांना ठकवल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी या डॉक्टरला अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. (delhi Husband takes loan from wife fake documents, arrested)

सुधाकर आर्या (वय 58) असं या डॉक्टरचं नाव आहे. दिल्लीच्या सीमेवरच उत्तर प्रदेशातली गाजियाबाद जिल्ह्यातील वैशाली येथे त्याचं नर्सिंग होण आहे. फसवणूक झाल्याची तक्रार या महिलेने केल्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. ही महिला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे आली होती. यावेळी तिने पोलीस आयुक्त आर. के. सिंह यांना सर्व घटनाक्रम सांगितला. मी एका डॉक्टरची पत्नी आहे. 2006 पासून आम्ही विभक्त राहत आहोत, असं तिने सांगितलं. एकदाही महिला मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्याकरिता पंजाब नॅशनल बँकेत गेली होती. त्यावेळी बँकेने त्यांना एज्युकेशन लोन देण्यास नकार दिला. त्या बँकेच्या डिफॉल्टर असल्याचं बँकेने त्यांना सांगितलं. तुम्ही दिल्लीतील नेताजी सुभाष पॅलेस येथील डीएचएफएल बँकेकडून पावणे तीन कोटी रुपयांचे दोन लोन घेतले आहेत. ते लोन अद्यापपर्यंत तुम्ही चुकवलेले नाहीत, असं बँकेने त्यांना सांगितलं. बँकेकडून मिळालेल्या या माहितीमुळे ही महिला थक्कच झाली. त्यांनी कोणत्याच बँकेतून लोन घेतलेलं नव्हतं. तरीही पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्यावर एक कर्ज 1 कोटी तीन लाख 97 हजार 767 रुपयांचं आणि दुसरं 1 कोटी 85 लाख 50 हजार रुपयांचं लोन असल्यांच सांगितलं.

पत्नीच्या बनावट कागदपत्रांवरून

जेव्हा या महिलेने तिच्या पद्धतीने चौकशी केली असता तिच्या नावावर डीएचएफएल बँकेचे दोन कर्ज सुमारे 2 कोटी 89 लाख रुपयांचे असल्याचं आढळून आलं. अनेक वर्षांपासून विभक्त राहत असलेल्या आपल्या पतीनेच आपल्या नावावर ही कर्ज काढल्याची माहितीही या महिलेला मिळाली. या महिलेला कळू न देता तिचे बोगस कागदपत्रे बँकेत जमा करून त्याने हे लोन घेतल्याचं आढळून आलं. या कागदपत्रांवर बँकेने त्यांना लोन दिलं. पण जेव्हा कर्ज फेडण्याची वेळ आली तेव्हा त्याने बँकेला कर्ज दिलं नाही. त्यामुळे जेव्हा ही महिला मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज काढण्यासाठी बँकेत गेली तेव्हा तिच्यावरच कर्ज असल्याचं सांगून बँकेने तिला कर्ज देण्यास नकार दिला.

उच्च न्यायालयात धाव

हे प्रकरण लक्षात आल्यानंतर महिलेने थेट दिल्ली उच्च न्यायालयातच अर्ज दाखल केला. तिने हेबीयस कॉर्पस याचिका दाखल केली होती. त्याला नोटीस मिळाल्यानंतर कोर्टात हजर राहणं बंधनकारक व्हावं म्हणून तिने ही याचिका दाखल केली होती. त्यानंतर या डॉक्टरला चार नोटीसा पाठवण्यता आला. तरीही तो कोर्टात आला नाही. त्यामुळे पतीने आपल्या नावाने लोन घेतले असून आता तो मुद्दाम कोर्टात येत नसल्याचं या महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने थेट आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे जाऊन पतीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

बनावट सह्या आणि कागदपत्रे

त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने पोलीस उपायुक्त के. रमेश यांच्या नेतृत्वाखाली एक टीम स्थापन केली आहे. या डॉक्टरला ताब्यात घेण्यापूर्वी बँकेतून या महिलेने नव्हे तर डॉक्टरानेच सर्व पैसे हडपल्याची माहिती या पथकाने मिळवली. त्यानंतर सुधाकर आर्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हाही कबुल केला. पत्नीच्या बनावट सह्या करून हे कर्ज घेतल्याचं त्यांने सांगितलं. पत्नीचे बनावट पॅनकार्ड, वोटर आयडी कार्ड सुद्धा बनवल्याचं त्याने सांगितलं. धक्कादायक म्हणजे त्याच्या पत्नीचं ओरिजनल पॅनकार्ड आणि व्होटर कार्ड ही त्याच्याकडेच सापडलं. त्याने पत्नीसोबत घेतलेली मालमत्ता बँकेत मोर्टगेज केली होती. लोन फेडता येत नसल्याने त्याने या मालमत्तेचा लिलाव करण्याची विनंती बँकेला केली होती. दरम्यान, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. (delhi Husband takes loan from wife fake documents, arrested)

संबंधित बातम्या:

अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत घटना, त्या खुनाचं कोडं उलगडलं, पहिल्यांदाच बालाजीच्या मृत्यूचं कारण उघड

‘देवमाणूस’ ज्यापासून प्रेरित, त्या डॉ. संतोष पोळने जिवंतपणी गाडले सहा जणांना

पडद्यावर बड्या कलाकारांची आई; उर्मिला भट्ट यांची राहत्या घरी झालेली गळा चिरुन हत्या

(delhi Husband takes loan from wife fake documents, arrested)

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.