अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत घटना, त्या खुनाचं कोडं उलगडलं, पहिल्यांदाच बालाजीच्या मृत्यूचं कारण उघड

बालाजी रुद्रवार यानेच पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर वार करुन आत्महत्या केली, अशा बातम्या न्यू जर्सीमधील माध्यमांकडून प्रकाशित झाल्या आहेत (Beed Couple Rudrawar Murder Suicide )

अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत घटना, त्या खुनाचं कोडं उलगडलं, पहिल्यांदाच बालाजीच्या मृत्यूचं कारण उघड
बालाजी आणि आरती रुद्रावार यांचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 1:47 PM

अंबाजोगाई : नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत असलेल्या बीडच्या अंबेजोगाईतील रुद्रावार दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू (Indian Couple Suspicious Murder in US) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला सहा दिवस उलटल्यानंतरही बालाजी आणि आरती रुद्रावार यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे. बालाजीनेच पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु बालाजी असं करु शकत नाही, असा दावा रुद्रावार कुटुंबियांनी केला आहे. या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. (Beed Couple Arati Balaji  Rudrawar Murder Suicide Case in New Jersey America Ambejogai Family Reacts)

“बालाजी पत्नीला भोसकू शकत नाही”

बालाजी रुद्रवार यानेच पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर वार करुन आत्महत्या केली, अशा बातम्या न्यू जर्सीमधील माध्यमांकडून प्रकाशित झाल्या आहेत. अद्याप प्रशासकीय पातळीवरुन कोणतीही माहिती बालाजीच्या कुटुंबीयांना देण्यात आलेली नाही. परंतु बालाजी असं करु शकत नाही, असा दावा बालाजीचे वडील भारत रुद्रावार यांनी केला आहे. या सर्व प्रकरणानंतर बालाजी आणि त्याच्या पत्नीचा घातपात झाला असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

अंत्यसंस्काराबद्दल अद्याप निर्णय नाही

दरम्यान, बालाजी आणि आरती यांचे मृतदेह बीडला आणायचे की त्यांच्यावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार करायचे, याबाबत कुटुंबीयांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. अमेरिकेत पार्थिवांवर अंत्यसंस्कार करायचे ठरल्यास झूमद्वारे कुटुंबीयांना सहभागी होता येईल, अशी हमी अमेरिकेतील टीम-एडतर्फे रुद्रावार कुटुंबीयांना देण्यात आली आहे. तर त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीची काळजीही तूर्तास घेतली जात आहे. सध्या ऑटोप्सीसाठी मेडिकल एक्झॅमिनर ऑफिसकडे दोघांचे मृतदेह सोपवण्यात आले आहेत.

बालाजी-आरती रुद्रावार संशयास्पद मृत्यू

32 वर्षीय बालाजी रुद्रवार आणि 30 वर्षीय आरती रुद्रवार यांचा मृतदेह गेल्या बुधवारी न्यूजर्सीतील राहत्या अपार्टमेंटमध्ये चाकूने भोसकलेल्या अवस्थेत आढळला होता. बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत बसल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी या घटनेबद्दल पोलिसांना कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरती रुद्रावार सात महिन्यांची गर्भवती

अंबेजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रुद्रवार यांचा बालाजी हा मुलगा होता. आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने बालाजी सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात स्थायिक झाला होता. बालाजीची पत्नी आरती रुद्रावार सात महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

अमेरिकेत असं काय घडलं की अंबाजोगाईच्या बालाजीनं बायकोला मरेस्तोवर भोसकलं? मग बालाजी कसा संपला?

बीडमधील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?; जाणून घ्या 10 पॉइंट्समधून

(Beed Couple Arati Balaji  Rudrawar Murder Suicide Case in New Jersey America Ambejogai Family Reacts)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.