पत्नी टीव्ही बघत होती, पतीने तो बंद करण्यास सांगितले, ऐकले नाही म्हणून सरळ बंदूकच ताणली…

Crime News : एक महिला टीव्ही बघत होती, तेव्हा तिच्या पतीने टीव्ही बंद करायला सांगितला. मात्र तिने ते ऐकले नाही...

पत्नी टीव्ही बघत होती, पतीने तो बंद करण्यास सांगितले, ऐकले नाही म्हणून सरळ बंदूकच ताणली...
| Updated on: Jun 10, 2023 | 5:54 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशातील रामपूरमधून पती-पत्नीमधील वादाचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे महिला टीव्ही सीरियल पाहत होती. दरम्यान, मद्यधुंद पतीने तिला टीव्ही बंद करण्यास सांगितल्यावर वाद झाला. यावर त्याने परवाना असलेली बंदूक काढून गोळी मारली.

हे प्रकरण रामपूरच्या स्वार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समोदिया गावाशी संबंधित आहे. येथे श्यामलाल आपल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवारी त्याची पत्नी घरी एक मालिका पाहत होती. त्याने तिला टीव्ही बंद करायला सांगितल्यावर दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान श्यामलाल इतका संतापला की त्याने परवाना असलेली बंदूक काढून गोळीबार केला, त्यात महिलेच्या उजव्या हाताला गोळी लागली.

गोळी मारून घरातून पळाला आरोपी

गोळीबार केल्यानंतर तो फरार झाला. नातेवाईकांनी घाईघाईत महिलेला शासकीय रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर तिला हायर सेंटरमध्ये रेफर केले. याप्रकरणी महिलेच्या मुलाने स्वार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

यासोबतच त्याला बंदुकीसह अटक करण्यात आली आहे. महिलेची प्रकृतीही स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक संसार सिंह यांनी सांगितले की, पीडितेच्या मुलाच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आरोपीला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे.