
सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सर्वांना वाटत होतं 19 वर्षीय त्याच्या मोबाईलच्या दुकानात प्रामाणिकपणे काम करत आहे. पण त्याच्या मोबाईलच्या दुकानामागे वेगळंच कोणतं काम सुरु होतं. याबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाच्या घरावर छापा टाकला आहे, भयानक गोष्टी जप्त केल्या आहे. याप्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे. संबंधित घटना कल्याण येथे घडली आहे… कल्याण पश्चिमेतील युसुफ हाइट्स या गजबजलेल्या इमारतीत पोलिसांनी छापा टाकत मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
कल्याण पश्चिमेतील घास बाजार परिसरातील युसुफ हाईट्स इमारतीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाच्या घरातून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात सुरा, गुप्ती आणि लोखंडी चाकू आढळून आले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
कल्याण पश्चिमेतील घास बाजार परिसरातील युसुफ हाईट्स इमारतीत राहणाऱ्या युवेश हनिफ सय्यद या तरुणाच्या घरातून पोलिसांनी प्रतिबंधित शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे, हा तरुण मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे.
बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार राहुल ईशी यांच्या तक्रारीनुसार, रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, युसुफ हाईट्सच्या बी विंगमधील एका घरात शस्त्रसाठा ठेवण्यात आला आहे. ही माहिती वरिष्ठांना कळवून पोलिसांनी तात्काळ छापा टाकण्याची कारवाई सुरू केली.
रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला. दरवाजा उघडल्यानंतर घरात युवेश सय्यद उपस्थित होता. चौकशीदरम्यान त्याने स्वतःकडे सुरा, मुठीची गुप्ती आणि लोखंडी चाकू असल्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत हा शस्त्रसाठा जप्त केला आणि युवेशला ताब्यात घेतले. या प्रकरणी प्रतिबंधित शस्त्र बाळगणे आणि पोलिसांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी युवेश सय्यदविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय करणाऱ्या या तरुणाकडे इतका शस्त्रसाठा कशासाठी होता, तो कुठून आणला आणि यामागे आणखी कोणी आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, अंबिका घस्ते यांच्यासह पोलिसांच्या पथकाने सहभाग घेतला.