AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी गाव झालं प्रकाशमान ! नैनीतालमधील या गावात आली वीज

नैनितालमधील गोरिया देव गावातील टोक ग्वाल देव येथे पहिल्यांदाच वीज आल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनास झाला आहे. राकेश नैनवाल आणि खासदार निधीच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. दुर्गम डोंगराळ भागातून वीजवाहिन्या टाकून घरांपर्यंत वीज पोहोचवण्यात आली असून, आता रस्ते बांधणीचे आश्वासनही मिळाले आहे.

स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी गाव झालं प्रकाशमान ! नैनीतालमधील या गावात आली वीज
स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी गाव झालं प्रकाशमान !
| Updated on: Mar 30, 2026 | 12:30 PM
Share

देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 7 दशकं झाली, मात्र 78 वर्षांनीही देशातील काही गावांत वीजेचा मागमूस नव्हता. नैनीताल विधानसभा क्षेत्रातील गोरिया देव गावच्या टोक ग्वाल देव येथेही अशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र आता जवळपास 78 वर्षांनी वीज आल्याने हे गाव प्रकाशमान झाल्याने, गावकरी आनंदित झाले आहेत. वीजेसारख्या मूलभूत सुविधांपासून दीर्घकाळापासून वंचित असलेल्या गावकऱ्यांसाठी (वीज येणं) हे एका स्वप्नपूर्तीसारखं आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री राकेश नैनवाल यांच्या प्रयत्नांमुळे हे काम शक्य झाले. त्यांनी खासदार अजय भट्ट यांच्या खासदार निधीतून गावाला वीजपुरवठा मिळवून देण्याचं काम केलं.

अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही, वीज विभागाच्या पथकाने उंच डोंगरांमधून अडीच किलोमीटरची वीज वाहिनी टाकली आणि भूपाल सिंग नेगी, गोविंद सिंग नेगी व राम सिंग नेगी यांच्या घरांपर्यंत वीज पोहोचवली. गावात वीज पोहोचल्यानंतर मी गावाला स्वतः भेट देईन, असा संकल्प केला होता, अखेर आता हे काम पूर्ण झालं, असं राकेश नैनवाल यांनी नमूद केलं. हे काम सरकारच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. त्यांनी नैनितालचे खासदार अजय भट्ट यांचा विशेष उल्लेख केला, या दुर्गम भागात वीजपुरवठा खासदार विकास निधीमुळे (MPLADS) शक्य झाला असंही त्यांनी सांगितलं.

कित्येक वर्षांनी वीज आल्याने गावातील सर्व कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यादरम्यान राकेश नैनवाल यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिलं की, गावापर्यंत लवकरच रस्त्याची जोडणी देखील करून दिली जाईल. खासदारांशी चर्चा करून रस्ता बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असं ते म्हणाले.

माजी प्रमुख राजू नेगी यांनी या प्रसंगी विशेष सहकार्य केले. सरपंच बालम नेगी, किसान मोर्चा कार्यकर्ते ललित नेगी, ज्येष्ठ नेते हरीश बेलवाल, माजी मंडी उपाध्यक्ष मन सिंग रावत, वीज विभागाचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी दीपक पाठक, चंदन जलाल आणि इतर अनेक ग्रामस्थही उपस्थित होते.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ