AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात पैसा टिकण्यासाठी पाच सोपे उपाय, कधीच आर्थिक संकट येणार नाही

अनेकांसोबत असं घडतं की ते प्रचंड पैसा कमवतात, परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. या समस्येसाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात पैसा टिकण्यासाठी पाच सोपे उपाय, कधीच आर्थिक संकट येणार नाही
VASTU SHTRAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 7:56 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध समस्यांवर अध्यात्माच्या आधारावर काही उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की, ते प्रचंड कष्ट करतात. परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. त्यामागे विविध कारणं असू शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तरी देखील अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील काही सोप्या उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात, वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

लक्ष्मी मातेचा फोटो – लक्ष्मीला धनाची देवता असं म्हटलं जातं. लक्ष्मी मातेच्या कृपेनी घरातील गरिबी दूर होते. घराला बरकत प्राप्त होते. घर धन, धान्याने भरून जातं. त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो हा असलाच पाहिजे, दररोज नित्य नियमाने लक्ष्मी मातेची पूजा करावी, लक्ष्मी मातेच्या फोटोला दररोज एक लाल फूल अर्पण करावं, यामुळे तुमच्या सर्व समस्या नष्ट होतील, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

कुबेराचा फोटो – कुबेराला देखील धनाची देवता म्हटलं जातं. उत्तर दिशा ही कुबेराची आवडती दिशा असते, त्यामुळे नेहमी तुमच्या घरात उत्तरेकडे असलेल्या भिंतीला कुबेराचा फोटो लावावा, कुबेराच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या अडी अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे.

तुळस – तुळस हे झाड माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं सर्वात आवडतं झाड आहे. असं म्हणतात ज्या घरात तुळस असते, त्या घरात आयुष्यात कधी पैशांची कमी भासत नाही, त्यामुळे जर तुम्हालाही आर्थिक समस्या जाणवत असतील, तर घरात तुळस ही आवश्य लावावी, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

शमीचं झाड- वास्तुशास्त्रामध्ये शमीचं झाडं देखील अत्यंत शुभ माण्यात आलं आहे, जर तुम्ही खूप प्रचंड कष्ट करत आहात, दिवस-रात्र मेहनत करत आहात आणि इतकं करूनही तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर त्यासाठी घरात एक शमीचा वृक्ष लावावा असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

स्वच्छता – वास्तुशास्त्रानुसार जिथे स्वच्छता असते, तिथेच लक्ष्मी माता येते. त्यामुळे आपलं घर हे नेहमी स्वच्छ ठेवावं, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...