AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 रुपयात 142 किमी दामटा, Ampere च्या या इलेक्ट्रिक स्कूटरची जोरदार चर्चा, किंमत आणि फीचर्स काय?

Ampere magnus g max: ॲम्पीअरच्या इलेक्ट्रिक स्कूटरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मॅग्नस जी मॅक्स ही स्कूटर अवघ्या 30 रुपयात 142 किमी दामटता येणार आहे. या स्कूटरमध्ये क्रुझ कंट्रोल, हिल होल्ड आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशनसह अनेक फीचर्स आहेत. काय आहे या ईव्हीची किंमत?

30 रुपयात 142 किमी दामटा, Ampere च्या या इलेक्ट्रिक स्कूटरची जोरदार चर्चा, किंमत आणि फीचर्स काय?
30 रुपयात 142 किमी दामटाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 15, 2026 | 7:45 PM
Share

Ampere ची इलेक्ट्रिक स्कूटर Magnus G Max स्कूटरमध्ये NxG.io सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मद्वारे कनेक्टिव्हिटी अपग्रेड करण्यात आली आहे. कंपनीने नवीन फीचर्ससह मॅग्नस जी मॅक्स ही स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये 30 हून अधिक फीचर्स आणि नवीन 5-इंचाचा डिस्प्ले जोडण्यात आला आहे. यामध्ये क्रूज कंट्रोल, हिल होल्ड, टर्न बाय टर्न नेविगेशन आणि OTA अपडेट्स आहेत. काय आहेत या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत?

तुमच्या फोनवर मिळवा माहिती

मॅग्नस जी मॅक्समध्ये फाईंड माय स्कूटर आणि पिंग माय स्कूटर असे फीचर्स आहेत. यामुळे पार्किंगमध्ये स्कूटर शोधणे अगदी सोपे होणार आहे. मॅग्नस जी मॅक्स ही स्कूटरमध्ये ॲपद्वारे रिअल टाईम चार्जिंग स्टेट्‍स, स्कूटरचे लोकेशन, चार्जिंग हिस्ट्री, आणि बॅटरची माहिती पाहू शकतील. जिओ-फेन्सिंग, चोरीचा अलर्ट आणि टोईंग नोटिफिकेशन्स हे फीचर्सही या स्कूटरमध्ये मिळतात. OTA हे नवीन सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म अपडेट्सची सुविधा देतो.

बॅटरी लाईफविषयी मोठी अपडेट

या ईव्हीतील बॅटरची लाईफ 2,00,000 पर्यंत आहे. बॅटरी पॅक BLDC हब माऊंटेड इलेक्ट्रिक मोटरला जोडलेला आहे. त्याला 2.4 kw ची पीक पॉवर आणि 130 NM व्हील टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार, या ईव्हीला 142 किमीची रेंज आणि 100 किमीपेक्षा जास्त रेंज देते. ही स्कूटर ताशी 65 किमीचा टॉप स्पीड देते. स्कूटर 5 वर्षे आणि 75,000 किमीच्या वॉरंटीसह येते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1,02,999 रुपये इतकी आहे.

30 रुपयांत 142 किलोमीटरचा गाठेल पल्ला

ही ईव्ही ड्युअल टोन रंगात उपलब्ध आहे. सध्या मान्सून ब्लू आणि मॅचा ग्रीनमध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे. आता सिनामन कॉपर या रंगात ती न्हाऊन निघाली आहे. यात 3kwh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. ती चार्ज करण्यासाठी अंदाजे 3 ते 3.5 युनिट्स लागतील. विद्युत दर प्रति युनिट 8 रुपये जरी गृहीत धरला तरी चार्जिंगसाठी 30 रुपयांपर्यंत खर्च येईल. यामुळे 30 रुपयांमध्ये ही स्कूटर 142 किलोमीटर दामटता येणार आहे. हा फायद्याचा सौदा ठरू शकतो.

या सुविधेमुळे ग्राहक खूश

या ईव्हीमध्ये क्रुझ कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. हिल होल्ड असिस्टमुळे चढण आल्यावर स्कूटर मागे मागे येण्यापासून रोखल्या जाईल. अशा परिस्थिती स्कूटर चालकाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना स्कूटर पुढे ढकलणे सोपे जाईल. फाईंड माय स्कूटर या खास फीचरमुळे तुमच्या फोनवरील ॲपद्वारे स्कूटर कुठे आहे, तिचे लोकेशन, स्थान शोधणे सोपे होईल.

Follow Us
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?