AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरे आंबे आणि विषारी रसायने असलेले आंबे कसे ओळखाल? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या टीप्स

आंबे आवडत नाहीत... अशा व्यक्ती फार कमी असतील. वर्षातून एकदा येणारे आंबे सर्वांना प्रचंड आवडतात. पण आता विषारी रसायने असलेले आंबे देखील बाजारात मोठ्या प्रमाणात विकायला ठेवतात. पण खरे आंबे कसे ओळखू शकतो... याबद्दल महत्त्वाच्या टीप्स जाणून घ्या

खरे आंबे आणि विषारी रसायने असलेले आंबे कसे ओळखाल? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या टीप्स
Mango
| Updated on: Mar 30, 2026 | 12:40 PM
Share

उन्हाळा सुरु होताच आणि परीक्षा संपल्यानंतर मुलं एकाच गोष्टीच्या प्रतिक्षेत असतात आणि ते म्हणजे आंबे… आंबे खायला अनेकांना आवडतात. आता तर बाजारात आंबे येण्यास सुरुवात देखील झाली आहे. पण बाजारात दोन प्रकारचे आंबे असतात, खरे आंबे आणि विषारी रसायन असलेले आंबे…पण तुम्हाला माहित आहे का की हे आकर्षक दिसणारे आंबे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात? अनेक व्यापारी फळे लवकर पिकवण्यासाठी प्रतिबंधित रसायनांचा वापर करत आहेत.

आंब्याचा सीझन आता जवळ येत असताना, बाजारातील बनावट आंब्यांमागील सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. फळे नैसर्गिकरित्या पिकायला वेळ लागतो, त्यामुळे जास्त नफा कमावण्यासाठी काही व्यापारी आंबे रासायनिक द्रावणात बुडवून पिकवतात. एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे की, एफएसएस कायदा 2006 अंतर्गत फळे पिकवण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे याबद्दल खास टीप्स जाणून घ्या…

वास: नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यांचा वास गोड आणि सुगंधी असतो, तर रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांचा वास विचित्र किंवा औषधी येतो.

डाग आणि खुणा: आंबे विकत घेताना, त्यावर कोणतेही विचित्र डाग किंवा इंजेक्शनच्या खुणा आहेत का ते तपासा. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यांच्या सालीवर असे डाग असण्याची शक्यता कमी असते.

सालीचा रंग: रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे एकसारखे पिवळे किंवा नारंगी रंगाचे असतात आणि अतिशय चमकदार दिसतात. नैसर्गिक आंब्यांचा रंग मिश्र असतो, कधी हिरवट तर कधी पिवळसर.

बेकिंग सोडा चाचणी: एका भांड्यात पाणी भरा, त्यात थोडा बेकिंग सोडा टाका आणि आंबा १५ ते २० मिनिटे त्यात ठेवा. बाहेर काढल्यावर जर आंब्याचा रंग बदलला, तर याचा अर्थ त्यावर पॉलिश किंवा रसायने वापरली गेली आहेत.

आगकाडीचा प्रयोग: अल्फोन्सो मँगोच्या वेबसाइटनुसार, जर तुम्ही पेटलेली आगकाडी आंब्यांच्या बॉक्सजवळ नेली आणि ती लगेच पेटली, तर याचा अर्थ असा होतो की तिच्यावर रासायनिक प्रक्रिया केलेली आहे. रसायनांच्या उपस्थितीमुळे आगकाडीच्या पृष्ठभागावर चमकदार खुणा देखील दिसू शकतात.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय