AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसाद खाताच महिला व्हायच्या बेभान! त्या औषधाचं गूढ उलगडलं? खरातने पोलिसांना काय सांगितलं?

अशोक खरात प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरात महिलांना खायला देत असलेल्या कडवट औषधामध्ये नेमकं काय होतं? याबाबात तपास सुरु आहे.

प्रसाद खाताच महिला व्हायच्या बेभान! त्या औषधाचं गूढ उलगडलं? खरातने पोलिसांना काय सांगितलं?
अशोक खरातImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 30, 2026 | 12:40 PM
Share

स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सध्या राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवर, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. काही महिलांवर तर बलात्कार देखील केला. लिंगपिसाट अशोक खरातच्या काळा कारनाम्यांचे जवळपास 56 व्हिडीओ समोर आले. तसेच त्याच्याविरोधात 11 तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या लैंगिक शोषण प्रकरणातील धक्कादायक तपास एसआयटी (SIT) च्या हाती आहे. खरातच्या पाशवी कृत्यांविषयी एक एक करत धक्कादायक माहिती उघडकीस येत असून, महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने वापरलेल्या ‘गूढ औषधा’ची माहिती समोर येऊ लागली आहे.

पीडितांना बेशुद्ध करण्याची कथित पद्धत

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आपल्या केबिनमध्ये येणाऱ्या महिलांना एक विशेष प्रकारचे गूढ औषध देत असे. हे औषध खारट किंवा कडवट चवीचे असल्याचे समोर आले आहे. तसेच तो त्यासोबत विशेष पेढे खायला लावत असे. या पदार्थांचे सेवन केल्यानंतर महिलांना काही वेळातच मळमळणे, डोके गरगरणे, डोके जड होणे असे प्रकार सुरू होत असत. अर्धवट बेशुद्ध किंवा गुंगीच्या अवस्थेत असलेल्या महिलांवर खरात केबिनमधील दिवे बंद करून लैंगिक अत्याचार करत असे. या ‘प्रसादा’च्या प्रभावामुळे पीडित महिलांना त्याच्या सूचनांचे पालन करण्यास भाग पडत असे, असा एसआयटीचा दावा आहे.

औषधात काय होतं?

या प्रकरणातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे खरात महिलांना दिलेल्या त्या खारट द्रवात आणि पेढ्यांमध्ये नेमके कोणते रसायन किंवा घटक मिसळले होते? हे द्रव आणि पेढे कोणत्या प्रकारची गुंगी आणत होते? याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सांगितले की, अशोक खरात तपास यंत्रणेला याबाबत कोणतीही मदत करत नाही. या गूढ औषधांबद्दल तो काहीच सांगत नसल्याने, एसआयटीने त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली आहे. एसआयटी आता या ‘विषारी’ पेढ्यांचा आणि संशयित द्रव पदार्थाचा खरा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत या गूढ औषधांचे रहस्य उलगडते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

काल अशोक खरातला कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आरोपीला १ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. आता खरात प्रकरणात नवी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...