AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut UNCUT | आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut UNCUT | आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Mar 30, 2026 | 10:54 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच एका खासगी कार्यक्रमामुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना या भेटीचे समर्थन केले. ते म्हणाले, राजकीय मतभेद असले तरी एखाद्या शुभकार्याचे आमंत्रण मिळाल्यास त्याठिकाणी उपस्थित राहणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. अशावेळी वैयक्तिक संबंधांना प्राधान्य देत कटुता बाजूला ठेवणे योग्य ठरते. राऊत यांनी स्पष्ट केले की, हा पूर्णपणे कौटुंबिक कार्यक्रम होता आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर त्याठिकाणी उपस्थित होते. आदित्य ठाकरे केवळ काही वेळासाठी तिथे गेले होते, त्यामुळे या उपस्थितीला राजकीय वळण देणे अयोग्य आहे. तसेच, राजकारणात संघर्ष कायम असतो, मात्र सामाजिक शिष्टाचार आणि वैयक्तिक नातेसंबंध वेगळे असतात. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्यातून राजकीय जवळीक असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Published on: Mar 30, 2026 10:54 AM
Follow Us