चक्क बीएमसी आयुक्त इकबाल चहल यांनी व्हॉट्सअपवरुन पैसे मागितले? ते ही अधिकाऱ्यांकडेच?

| Updated on: Nov 02, 2022 | 1:35 PM

पैसे मागणाऱ्यांमध्ये हायप्रोफाईल नावं कुठून आली? आझाद नगर पोलिसांनी सांगितलं!

चक्क बीएमसी आयुक्त इकबाल चहल यांनी व्हॉट्सअपवरुन पैसे मागितले? ते ही अधिकाऱ्यांकडेच?
इकबाल सिंग चहल
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : बीएमसी आयुक्त इकबाल चहल (Iqbal Chahal) यांनी व्हॉट्सअपवरुन पैसे मागितले, असं कुणी म्हटलं तर त्यांना पैसे देण्यास कोण नकार देईल? बहुधा कुणीच नाही! पण हीच गोष्ट सायबर भामट्यांनी हेरली आणि गंडा घातला. आयुक्त इकबाल चहल यांचा फोटो प्रोफाईल फोटोला अपलोड केला आणि सायबर भामट्यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना (BMC Officers) टार्गेट केलं. चक्क बीएमसी अधिकारीही आयुक्त पैशांची मागणी करत असल्यामुळे आधी भांबावून गेले. पण अखेर हिंमत करुन त्यांनी पोलीस स्टेशन (Mumbai Cyber Crime) गाठलं आणि सगळं प्रकरण समोर आलं.

सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचा छडा लावताना पोलिसांच्याही नाकी नऊ येत आहेत. अशातच सायबर गुन्हेगार फसवणूक करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं उघडकीस आलंय. हायप्रोफाईल लोकही साबयर ठगांच्या जाळ्यात अडकण्याची भीती एका घटनेनं अधोरेखित केली आहे.

सायबर गुन्हेगार आता आयएएस अधिकाऱ्यांचे प्रोफाइल फोटो वापरून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता समोर आलेल प्रकरण तर थेट मुंबई बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी संबंधित आहे. आयुक्त चहल यांचा फोटो लावून गुन्हेगारांनी बीएमसी अधिकाऱ्याकडे पैशांची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासही केला जातो आहे. आझाद मैदान पोलिसांनी सांगितले की,

बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल, एसएनडीटीचे प्राचार्य, उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती आणि आयकर आयुक्त यांच्या नावानेही पैशांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

26 ऑक्टोबर रोजी बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचा प्रोफाईल फोटो टाकून WhatsApp Google Pay द्वारे त्यांच्याच सहकाऱ्यांकडून पैसे मागितल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून लोकांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलंय.

जर अज्ञात व्यक्तीने कोणाचा फोटो लावून पैसे मागितले तर त्याला पैसे देऊ नका. काळजी घ्या. नंबर पडताळून घ्या. चॅटिंगच्या माध्यमातून कुणासोबत आर्थिक व्यवहार करु नका, अशा सूचना पोलिसांकडून लोकांना करण्यात आल्या आहेत.