Razorpay Fraud : बोगस ट्रान्झॅक्शन करत तब्बल 7.18 कोटी रुपये उकळले! Razorpay मधून कोट्यवधींची धाडसी चोरी

| Updated on: May 21, 2022 | 10:00 AM

बोगस व्यवहारांतून 7 कोटी 38 लाख 36 हजार 192 रुपये गहाळ झाले असल्याचं समोर आलंय.

Razorpay Fraud : बोगस ट्रान्झॅक्शन करत तब्बल 7.18 कोटी रुपये उकळले! Razorpay मधून कोट्यवधींची धाडसी चोरी
पेमेंट गेटवे कंपनीतून कोट्यवधी उकळले
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बंगळुरू : रेझॉरपे (Razorpay) या पेमेंट गेटवे कंपनींला (Online Payment Gateway Company) तब्बल 7.18 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. बोगस ट्रान्झॅक्शन्स (Bogus Online Transactions) करत या कंपनीतून कोट्यवधी रुपयांची चोरी करण्यात आली. हॅकर्ससह काही फ्रॉड अकाऊंट्सवरुन व्यवहारात छेडछाड करत धाडसी चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी आता पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. 831 ट्रान्झॅक्शन संशयास्पद आढळ्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. रॅझोरपेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर आता याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी केली जाते आहे. या संपूर्ण ऑनलाईन फ्रॉडमुळे डिजिटल पेमेंटसाठी रेझॉरपे वापरणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 16 मे रोजी रॅझोरपे कडून या धाडसी चोरीप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. रॅझोरपेचे लिगल डिसप्युट आणि कायदा विभागाचे प्रमुख असलेल्या अभिषेख अभिनव आनंद यांनी याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनंतर रेझॉर पेच्या सॉफ्टवेअरशी छेडछाड करत सात कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार करण्यात आल्याचा प्रकार ऑडिट केल्यानंतर उघडकीस आला आहे.

कशी केली चोरी?

831 संशयास्पद ट्रान्झॅक्शनबाबत सुरुवातीला शंका घेतली होती. त्यानंतर या ट्रान्झॅक्शनबाबत चौकशी केली केली. त्यासाठी फिसर्व्ह या पेमेंट कंपनीच्या ऑथरायझेशन आणि त्यांच्या पार्टनरला याप्रकरणी संपर्क साधण्यात आला होता. दरम्यान, हे ट्रान्सझॅक्शन अयशस्वी झाल्याचे आणि अधिकृत नसल्यांचं कळवण्यात आलं.

मोठी बातमी : मलिकांच्या अडचणी वाढणार

हे सुद्धा वाचा

6 मार्चपासून 13 मे पर्यंतच्या काळात 831 संशयास्पद व्यवहार आढळून आले होते. या व्यवहारांतून 7 कोटी 38 लाख 36 हजार 192 रुपये गहाळ झाले असल्याचं समोर आलंय. आता या ऑनलाईन फसवणुकीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून 7 कोटीपेक्षा जास्त रक्कम गायब झाल्यानं रॅझोरपे वापरणाऱ्यांनाही मोठा धक्का बसलाय.

धक्कादायक

चोरी करण्यात आलेली रक्कम सोळा जणांकडून काढण्यात आल्याचं समोर आलंय. ऑनलाईन पेमेंटसाठी केल्या जाणाऱ्या ऑथोरायझेन आणि ऑथेंटीकेशन प्रोसेसशी छेडछाड करत ही रक्कम हॅकर्सनी चोरली असण्याचा संशय रॅझोरपेच्या अभिषेक अभिनव आनंद यांनी व्यक्त केलाय.

बोगस ट्रान्झॅक्शनसोबत ज्यांच्या खात्यातून पैसे गेले आहेत, त्यांनाही रॅझोरपेकडून कळवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी बोगस ट्रान्झॅक्शन केलं, त्यांचे आयपी एड्रेस, ट्रान्झॅक्शन केलेला दिवस, ट्रान्झॅक्शनची वेळ याबाबतही माहिती पोलिसांनी देण्यात आली आहे. सध्या पोलीस या धाडसी डिजिटल चोरीप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

रेझॉरपे काय आहे?

Razorpay Software Private Limited ही एका ऑनलाईन पेमेंट सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीद्वारे ऑनलाइन पेमेंट सेवा पुरवल्या जातात. भारतातील व्यवसायांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि वॉलेटद्वारे पेमेंट गोळा करण्याचं काम या कंपनीच्या सॉफ्टवेअरमधून केलं जातं.