Dombivali Accident : भरधाव बुलेटची सायकलला धडक, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

उषा पेट्रोल पंपासमोर अमरिश जात असताना वेगाने येणाऱ्या या बुलेट गाडीने अमरीशला पाठवून धडक दिली. यात अमरीश गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्याला उपचारासाठी डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Dombivali Accident : भरधाव बुलेटची सायकलला धडक, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
बुलेटची सायकलला धाव
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Feb 02, 2023 | 6:46 PM

डोंबिवली : भरधाव बुलेटने सायकलला दिलेल्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. डोंबिवलीत एमआयडीसी अभिनव बँक/उष्मा पेट्रोल पंपसमोर ही अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव वेगाने येणाऱ्या बुलेटने सायकलस्वारास धडक दिल्याची घटना घडली आहे. अपघाताची घटना व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अमरीश सिद्धाप्पा असे जखमी मुलाचे नाव असून, अमरीश डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार घेत आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. अमरीश सिद्धाप्पा असे अपघातात जखमी सायकलस्वाराचे नाव आहे.

सायकलवरुन कामावर चालला होता

डोंबिवलीमध्ये राहणारा अमरीश सिद्धाप्पा हा एका खाजगी कंपनीत काम करतो. बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातून आपल्या सायकलवरून कामावर चालला होता.

बुलेटने मागून सायकलला धडक दिली

यादरम्यान उषा पेट्रोल पंपासमोर अमरिश जात असताना वेगाने येणाऱ्या या बुलेट गाडीने अमरीशला पाठवून धडक दिली. यात अमरीश गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्याला उपचारासाठी डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी बुलेट चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढचा तपास सुरू केला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारसायकलींवर कारवाईची मागणी

डोंबिवलीत अशा भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटरसायकलीच्या अपघातात वाढ झाली असून, अशा मोटरसायकल चालकांवर कारवाई करत या परिसरात गतीरोधक बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.