Pune Crime | जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दिवसाढवळ्या दरोडा ; गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

पतसंस्थेत हेल्मेट घालेले दोन अज्ञात व्यक्ती आले. त्या दोघांनी व्यवस्थापक भोर यांच्याकडे थेट पैश्यांची मागणी केली. मात्र भोर यांनी नकार दिली. त्यानंतर त्यांनी थेट भोर यांच्यावर गोळीबार केला. अन जवळपास अडीच लाखांची रक्कम घेऊन दोघेही पसार झाले.

Pune Crime | जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दिवसाढवळ्या दरोडा ; गोळीबारात व्यवस्थापकाचा  मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद
junnar robbery
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 4:44 PM

जुन्नर- पुण्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी गावात दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदळी अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी जवळपास अडीच लाखांची रक्कम लंपास केली आहे. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात पतसंस्थेतील व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) हे गंभीर जखमी झाले आहेत.

सीसीटीव्हीमध्ये दरोडेखोर कैद

याबाबात मिळालेली माहिती अशी की आज (बुधवारी) दुपारी दीड वाजण्याचा सुमारास व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर व लिपिक अंकिता नेहरकर जेवण करत होते. त्याच दरम्यान पतसंस्थेत हेल्मेट घालेले दोन अज्ञात व्यक्ती आले. त्या दोघांनी व्यवस्थापक भोर यांच्याकडे थेट पैश्यांची मागणी केली. मात्र भोर यांनी नकार दिली. त्यानंतर त्यांनी थेट भोर यांच्यावर गोळीबार केला. अन जवळपास अडीच लाखांची रक्कम घेऊन दोघेही पसार झाले. पतसंस्थेतील सीसीटीव्हीमध्ये दोन्ही दरोडेखोर कैद झाले आहेत.

जिल्ह्यातील दरोड्याची दुसरी घटना

घटनेची माहिती मिळताच पोलीस व श्वान पथक घटनास्थळावर दाखल झाले . त्यांनी पंचनामा करत तपासाला सुरुवात केली आहे. मात्र दिवसाढवळ्या पडलेल्या दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात शिरूरमध्येही अश्याच प्रकारे बँकेवर दरोडा टाकल्याची घटना घडली होती.

व्यवस्थापकाचा मृत्यू

या घटनेत गंभीर जखमी झालेले व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय -५२) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांच्या पूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत मोठा निर्णय? सरकारकडून संध्याकाळी घोषणेची शक्यता

ST चा बंद जीवघेणा,आता तरी तोडगा निघावा, बीडमध्ये मालवाहू रिक्षातून विद्यार्थ्यांचा प्रवास!

मोठी बातमी | काँग्रेसचा स्वबळाचा नारा; महापालिका, झेडपी, पंचायत समिती निवडणुकीत एकला चलो रे!