
नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : राजधानी दिल्लीत (delhi) रोज काही ना काही घडंतच असतं. कधी मोठी चोरी, दरोडा, तर कधी पिस्तुलाच्या धाकाने लूट.. गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे दिल्लीकर त्रस्त असतानाच आता राजधानीत आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. अवघ्या एका शब्दामुळे शहरातील काही तरूणांमध्ये वाद होऊन गँगवॉर (gangwar) पेटलं आणि त्यात दोघा जणांना हकनाक जीव गमवावा (2 people kileed) लागला.
दिल्लीतील अशोक विहारमध्ये गँगवॉर होऊन दोघांचा मृत्यू झाला तर गल्याने गोळी एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. तसेच यावेळी चाकूचे वार झाल्यावेही अनेक जखमी झाले. साध्या मुद्यावरून सुरू झालेला हा वाद बघता-बघता पेटला आणि त्याचे हिंसक गँगवॉरमध्ये रुपांतर झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
नावावरून झालेला वाद भलताच पेटला
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अशोक विहार मध्ये एक इसमाला त्याच्या नावाने हाक मारल्यामुळे दोन गटांत प्रथम वाद सुरू झाला आणि ते एकमेकांना शिवीगाळ करू लागले. बघता-बघता वाद बराच वाढला आणि दोन्ही पक्ष एकमेकांना मारहाण करू लागले. त्यानतंर दोन्ही गटांकडून गोळीबारही करण्यात आला. या गँगवॉरमध्ये दोघांची हत्या झाली तर बंदूकीची गोळी
लागल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आदर देऊन बोलायचं नाहीतर… आणि सुरू झाला राडा
पोलिसांच्या सांगण्यानुसार, भलस्वा डेअरी परिसरात राहणारे रघू, झाकीर आणि भुरा हे सोमवारी रात्री अशोक नगर येथे डब्लू नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी आले होते. त्याचा शोध घेत होते, पण तो सापडत नव्हता. तेव्हा त्यांनी तेथील एका स्थानिक इसमाला विचारले की डब्ल्यू कुठे राहतो ? मात्र त्याने सरळ उत्तर दिले नाही. उलट ‘ डब्लू नाही, डब्लू भाई म्हणायचं’, असं त्यांनाच सुनावलं.
याच मुद्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. काही वेळाने डब्लू हा देखील तिथे आला. दोन्ही पक्षांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. त्याच दरम्यान, रघूने डब्लूला गोळी घातली. हे पाहून डब्लूच्या साथीदारांनी रघूला गोळ्या घातल्या. यात रघूचा जागीच मृत्यू झाला. या गँगवॉरदरम्यान रघूचे दोन साथीदार घटनास्थळावरून पळून गेले.
मात्र काही अंतरावर गेल्यावर रघूचा एक साथीदार भुरा पकडला गेला आणि डब्लूच्या साथीदारांनी त्याची हत्या केली. तर, घटनास्थळावरून पळून गेलेला रघूचा साथीदार झाकीर याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत जखमी झालेला डब्लूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.