
दिल्ली पोलिसांनी सासू-सुनेचं एक कांड उघडकीस आणलं आहे. या दोघांची कहाणी ऐकून तुम्ही हैराण व्हाल. या सासू-सुनेचं कांड ऐकून दिल्ली पोलीस हैराणच झाले आहेत. दिसायला सुंदर आणि श्रीमंत घरातील या महिला भागवत कथा ऐकायला एकत्र जायच्या. तिथे जाऊन पुरुषांशी खेटून बसायच्या. त्यानंतर त्या असं काही करायच्या की पोलिसात त्याच्या तक्रारी होऊ लागल्या. या महिला भागवत कथा ऐकताना लोकांच्या चैन, अंगठ्या, नेकलस हातोहात गायब करायच्या. इतक्या शिताफीने त्या चोरी करायच्या की बाजूला बसलेल्यांना त्याचा अंदाजही यायचा नाही.
बस, रेल्वेसह सार्वजनिक ठिकाणी चोरांकडून मोबाइल, घड्याळ आणि सोनसाखळ्या लंपास करण्याच्या घटना घडत असतात. दिल्ली पोलिसांनी ज्या दोन महिला चोरांना अटक केली आहे. त्यांची कहाणी ऐकून स्वत: पोलिसांनाच धक्का बसला आहे. या महिला सार्वजनिक वाहनांमध्ये नव्हे तर भागवत कथा ऐकायला जायच्या आणि चोरी करायच्या. भागवत कथा ऐकायला आलेल्या श्रीमंत घरातील महिलांच्या बाजूला त्या बसायच्या आणि कांड करायच्या. जेव्हा या महिला भागवत कथा ऐकून घरी जायच्या, तेव्हा आपल्या बाजूला बसलेल्या महिलांनी चोरी केल्याचं त्यांच्या लक्षात यायचं.
वाचा: मामीला पाहून भाच्याची नजर फिरली, इच्छाही पूर्ण झाली.. पण तेवढ्यात मामा कळालं अन्..
गर्दीत आल्या आणि…
दिल्ली पोलिसांना 26 मार्च 2025 रोजी एक तक्रार आली होती. शिव मंदिर मधुबन कॉलोनीत प्रीत विहारमध्ये भागवत कथेचा कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो होतो. संध्याकाळचे 6-7 वाजले असतील. तेव्हा गर्दीत एका अज्ञात व्यक्ती माझ्या गळ्यातील सोनसाखळी चोरली. ही सोनसाखळी 15 ग्रॅमची होती, असं तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे. या प्रकरणी प्रीत विहार पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
असंख्य सीसीटीव्ही कॅमेरे
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआय दिनेश त्यागी, एससी विशाला आणि सीटी चेतनची टीम स्थापन करण्यात आली. या टीमची निगराणी एसएचओ प्रीत विहार करत होते. तपास करण्यासाठी असंख्य सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. घटनास्थळावरील फुटेजचं गहन विश्लेषण करण्यात आलं. एका महिलेने तक्रारदार महिलेची सोनसाखळी चोरली होती. तर दुसऱ्या महिला तिला कव्हर करत होत्या. गुन्ह्यात त्यांना मदत करत होत्या. या महिलांचे फोटो तक्रारदार महिलांना दाखवण्यात आले. त्यांची ओळख पटली आणि पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात हे फोटो पाठवण्यात आले.
ओळख पटली, एक फरार
नंतर तीन महिलांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. या महिला कल्याणपुरी येथील राहणाऱ्या आहेत. 29 मार्च 2025 रोजी दोन महिलांना अटक करण्यात आली. एकीचं नाव ज्योती आहे. ती 30 वर्षाची आहे. दिल्लीच्या कल्याणपुरीत राहते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तक्रारदार महिलेची चैन चोरताना दिसत आहे. दुसरी निशा. ही 42 वर्षाची. तीही कल्याणपुरीतील राहणारी. तर ज्योती तिला मदत करायची. तिसरी महिला ज्योतीची सासू रेखा. ज्योती फरार आहे. दिल्ली पोलीस आता तिघींच्या संपत्तीचा तपास करत आहे. या महिला भागवत कथा ऐकताना पुरुषांना खेटून बसायच्या आणि त्यांची घड्याळ, पॉकेट आणि चैन चोरायच्या असंही तपासात आढळून आलं आहे.