एमबीबीएस विद्यार्थीनी सदिच्छा साने हत्या प्रकरण, सदिच्छाला या वस्तूचा वापर करुन संपवलं

मुंबई क्राईम ब्रँचने महानगर दंडाधिकारी न्यायालयात पालघरच्या मेडीकल स्टुडंट सदिच्छा साने हत्याप्रकरणातील आरोपींच्या पोलिग्राफीक आणि ब्रेन मॅपिंग टेस्टसाठी अर्ज केला आहे. दरम्यान, पोलीसांना अजूनही तिचा मृतदेह सापडलेला नसल्याने तपास खुंटला आहे,

एमबीबीएस विद्यार्थीनी सदिच्छा साने हत्या प्रकरण, सदिच्छाला या वस्तूचा वापर करुन संपवलं
sane (1)
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jan 25, 2023 | 3:35 PM

मुंबई : पालघरच्या मेडीकल स्टुडंट सदिच्छा साने ( Swadichha Sane ) हिच्या खून प्रकरणात पोलीसांना तपासाला वेग मिळत नसल्याने आरोपी मिथू सिंह याची आता लाय डीटेक्टर टेस्ट करण्यात येणार आहे. दरम्यान, गुन्ह्याचा हेतू स्पष्ट न झाल्याने तसेच साने हीचा मृतदेहच न सापडल्याने आता हा तपास तांत्रिक पुराव्याभोवती फिरत राहिला आहे. आरोपी पोलीसांना कोणतेही सहकार्य करीत नसल्याने आरोपीची ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ ( lie detector test ) करण्यासाठी पोलीसांनी आता कोर्टात धाव घेतली आहे.

पोलीसांना जोपर्यंत सदिच्छा साने हिचा मृतदेह सापडत नाही,  तोपर्यंत गुन्हा सिद्ध होणे कठीण आहे. त्यामुळे कोर्टात हा खटला उभा करून आरोपींना शिक्षा  मिळण्यासाठी मृतदेह आणि गुन्ह्याचा हेतू स्पष्ट होणे महत्वाचे असते. जे.जे.वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या सदिच्छा साने हिच्या बेपत्ता होण्यापूर्वी तिला भेटलेले लाईफगार्ड मिथू सिंह आणि त्याचा सहकारी जब्बार अन्सारी या दोघांना अटक होऊन त्यांची क्राईम ब्रँच चौकशी करीत आहे. परंतू ते दोघे नेमके कसे आणि तिला मारले आणि नेमके कुठे पुरले की समुद्रात फेकले हे सांगण्यास तयार नसल्याने पोलीसांचा कस लागत आहे.

मुंबई क्राईम ब्रँचने महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपींच्या पोलिग्राफीक आणि ब्रेन मॅपिंग टेस्टसाठी अर्ज केला आहे. आरोपीने सदिच्छा हिच्याशी झालेल्या वादातून तिचा खून केला आहे. परंतू तो नेमका कसा केला, त्याचा हेतू काय होता हे सिंग पोलीसांना सांगत नसल्याने अडचण आली आहे. तसेच तिचा मृतदेह बँड स्टँड समुद्राच्या परीसरात त्याने कुठेतरी पुरल्याचा संशय आहे. नेव्ही पथकाच्या मदतीने तपासणी करूनही अजून साने हिच्या शरीराचा कोणताही भाग सापडलेला नाही. त्यामुळ या प्रकरणाचा गुंता कायम असून  तपास रखडल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, पोलीसांना गुन्ह्यासाठी वापरलेली एक फायबर ट्युब सापडली असल्याचे वृत्त टाईम्सने दिले आहे. ही फायबर ट्यूबचा गुन्ह्यासाठी वापर झाल्याचा संशय आहे.