दिवाळीत उधार माल घेऊन मिठाईचा व्यापार केला, मग उधारीचे पैसे न देताच पोबारा केला; पण…

| Updated on: Apr 01, 2023 | 12:55 PM

दिवाळीत मिठाई बनवण्यासाठी लागणारे ड्रायफ्रुट, चांदीचा पेपर, साखर असा माल फॅक्टरी मालकाकडून उधारीवर घेतले. मात्र यानंतर उधारीचे पैसे द्यावे लागू नये म्हणून मिठाई व्यापारी पळून गेला.

दिवाळीत उधार माल घेऊन मिठाईचा व्यापार केला, मग उधारीचे पैसे न देताच पोबारा केला; पण...
फॅक्टरी मालकाची लाखोंची फसवणूक आरोपी जेरबंद
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई / गोविंद ठाकूर : ड्रायफ्रुट्स फॅक्टरी मालकाची लाखोंची फसवणूक करुन फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास दिंडोशी पोलिसांना यश आले आहे. मोंटू भुजन रॉय असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीने आपला मोबाईल बिहारमध्ये पाठवला. जेणेकरुन पोलिसांनी मोबाईल ट्रेस केल्यास आपण बिहारमध्ये असल्याचे पोलिसांना वाटावे आणि स्वतः मुंबईत चोरुन व्यवसाय करत होता. मात्र ‘कानून के हाथ लंबे होते है’ असे म्हणतात ना. तसेच झाले आणि पोलिसांनी या चलाख आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 403, 406, 420 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

दिवाळीत मिठाईसाठी 17 लाखांचा माल उधार घेतला

मिठाईचा कारखाना चालवणाऱ्या मोंटू रॉय याने दिवाळीत मिठाई बनवण्यासाठी मालाड येथील ड्रायफ्रुट्स फॅक्टरी मालकाकडून उधारीवर सामान घेतले होते. सुमारे 12 लाख किमतीचा ड्रायफ्रुट्स आणि चांदीचा फॉईल पेपर, 5 लाख किमतीची साखर घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. दिवाळीनंतर आरोपी मोंटूने पैसे देण्याचे कबुल केले होते. मात्र दिवाळीच्या आठवडाभरानंतर दुकान बंद करून तो पळून गेला.

मोबाईल फोनच्या आधारे पोलीस बिहारला गेले

फॅक्टरी मालकाने सुमारे एक महिना आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीचा फोन येत होता. यानंतर फॅक्टरी मालकाने दिंडोशी पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन ट्रेस केला असता तो बिहारमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक बिहारला गेले. तेथे गेल्यानंतर आरोपीचा फोन बिहारमध्ये असून, आरोपी मुंबईतील घाटकोपर येथे असल्याचे पोलिसांना कळले.

हे सुद्धा वाचा

आरोपीला घाटकोपर येथून अटक

आरोपी मिठाई व्यावसायिक असून, तो मुंबईतील कांदिवली येथे राहत होता. मात्र फॅक्टरी मालकाची फसवणूक केल्यानंतर आरोपीने घाटकोपरमध्ये छुप्या पद्धतीने व्यवसाय करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी घाटकोपर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीकडे चौकशी केली असता, पैसे द्यावे लागू नयेत आणि पोलीस त्याला पकडू नयेत म्हणून आरोपीने मिठाईचा कारखाना बंद करून घाटकोपरला पळून गेल्याचे उघड झाले. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने आपला फोन बिहारला पाठवला आणि मुंबई येथे व्यवसाय करण्यास सुरुवात केली.