
मुंबईसह अनेक शहरांतील रस्त्यांवर विविध ठिकाणी भटकी कुत्री फिरताना दिसतात. काही वेळा ती रस्त्यावर नुसती बसलेली असतात, पण बहुतांश वेळा या कु्त्र्यांमुळे खूप तार्स होतो, त्याचा उपद्व वाढतो. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर जाणं, बाईकच्या मागे भुंकत पळणे, लहान मुलांना चावणे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता दिव्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिव्यातील दिवा–आगासन रोड बेडेकर नगर मध्ये एका 5 वर्षांच्या चिमुकलीला कुत्रा चावला आणि तिचा मृत्यू झाला.
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दिव्यात राहणारी ही 5 वर्षांची निरागस मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र महिन्याभराच्या उपचारांनंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. चौथे इंडेक्शन दिल्यावर तर तिची तब्येत आणखी बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या कामावर नातेवाईकांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक संतप्त , चिमुकलीचा गेला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, दिवा आगासन येथे ही 5 वर्षांची चिमुकली पालकांसोबत रहायची. 17 नोव्हेंबर रोजी ती रात्री घराच्या बाहेर खेळत होती. मात्र तेवढ्यात तेथील एका पिसाळलेला कुत्रा तिच्यावर धावून आला आणि त्याने तिला चावत खांद्याचा लचकाच तोडला. मुलीचा आरडाओरडा ऐकून पालक धावत आले, तर त्यांना लेक गंभीर जखमी झालेली दिसली, कुत्र्याला कसंबस हाकलून दिलं. त्यानंतर तिच्या पालकांनी तिला डोंबिवलीमधील शास्त्री रुग्णालयात दाखल केलं, तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले.
जवळपाास महिनाभर तिच्यावर उपचार सुरू होते. तिथे तिला 4 इंजेक्शन्स देण्यात आली. मात्र त्यानंतर तिची प्रकती आणखीनच खालावली. उपचारांदरम्यानच 3 डिसेंबरला तिचा वाढदिवसही झाला, तेव्हा तिची प्रकृती जरा स्थिर होती. त्यानंतर 16 डिसेंबरला उपचारांचा शेवटचा टप्पा सुरू होता, तेव्हा तिला चौथं इंजेक्शन देण्यात आल्यावर तिची तब्येत अचानक बिघडली. त्यातच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याने उपचार पद्धती, औषधांचा दर्जा व वैद्यकीय निरीक्षणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी महापालिका व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली असून या मृत्यूप्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.