
डोंबिवली – दरोड्याच्या गुन्हात गुजरातमध्ये (Gujrat) न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत असलेल्या अट्टल गुन्हेगारास रामनगर (Ramnagar) पोलिसांनी डोंबिवलीतून (Dombivali Police) अटक केली आहे . महेश उर्फ भुऱ्या उर्फ रमेश चंदनशिवे असे अटक आरोपीचे नाव आहे. तो पॅरोलच्या रजेवर फेब्रुवारी महिन्यात बाहेर आला होता. महेश हा पुन्हा जेलमध्ये न जाता डोंबिवलीत दहशत माजविण्यासाठी कमरेला पिस्तुल लावून नागरिकांना मारहाण करत होता. संतप्त जमावाने चोप देत रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मिळाली आहे. तो जेव्हापासून जेलमधून बाहेर आला होता. तेव्हापासून तो तिथल्या नागरिकांना त्रास देत होता. मागच्या काही दिवसांपासून त्याचाकडून अनेकांना त्रास होत असल्याने नागरिकांनी ठरवून आरोपीला चोप दिला. तसेच पोलिसांच्या ताब्यात दिले. ज्यावेळी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्याकडून हत्यारे हस्तगत करण्यात आली.
दरोड्याच्या गुन्ह्यात सुरत येथील कारागृहात 7 वर्षाची शिक्षा भोगत असलेला महेश उर्फ भुऱ्या उर्फ रमेश चंदनशिवे नावाचा आरोपी फेब्रुवारी 2022 मध्ये पॅरोल रजेवर बाहेर आला होता . 21 मार्च 2022 ला तो सुरतच्या कारागृहात राहणे अपेक्षित होते . मात्र तो हजर न होता जेलमधून फरार होता. डोंबिवलीतील आयरे गाव परिसरात राहत होता . गुन्हेगार असल्याने परिसरात भाईगिरी व दहशत माजविण्यासाठी आरोपी कोणालाही शिवीगाळ व मारहाण करत होता. ठरल्याप्रमाणे बुधवारी रात्री बेभान होत आयरे गाव परिसरातील झोपडपट्टीत पिस्तुलचा धाक दाखवत धिंगाणा घालण्यास सुरवात केली. त्याची दहशत पाहून लोकांमध्ये धावपळ सुरू झाली .तो आरडाओरडा करत शिवीगाळ करत कोणाला मारहाण करत होता. अखेर संतालेल्या जमावाने त्याला धडा शिकवत आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाले केले . गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या आरोपीकडून पोलीसांनी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस ताब्यात घेत त्याला उपचारासाठी मुंबईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. 3 दिवसांच्या उपचारानंतर त्याला ताब्यात घेत त्याची रवानगी पुन्हा जेलमध्ये करण्यात आली.
जेलमधून पॅरोल रजेवर बाहेर आल्यानंतर अनेक आरोपीनी पुन्हा धिंगाणा घातला आहे. तसेच अनेक आरोपी पॅरोल रजेवरुन बाहेर आल्यानंतर अद्याप फरारी आहेत. आरोपीला कोणत्या गुन्ह्यात शिक्षा झाली आहे, हे अद्याप समजलेलं नाही.