Dombivli Crime : चक्क पोलिस स्टेशन समोरच चोरी, मोबाईलच्या दुकानाला भगदाड पाडून लांबवली रोख रक्कम

डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा काही धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. डोंबिवलीमध्ये पोलिस स्टेशनच्या समोर असलेल्या एका दुकानातच चोरी झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला.

Dombivli Crime : चक्क पोलिस स्टेशन समोरच चोरी, मोबाईलच्या दुकानाला भगदाड पाडून लांबवली रोख रक्कम
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 8:19 AM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 29 जानेवारी 2024 : डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांत गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र पोलिसांनी चौफेर लक्ष ठेवत, अनेक गुन्हेगारांना जेरबंदही केले. मात्र आता डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा काही धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. डोंबिवलीमध्ये पोलिस स्टेशनच्या समोर असलेल्या एका दुकानातच चोरी झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

मोबाईलच्या दुकानाच्या छताला भगदाड पाडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि मोबाईल्ससह, रोख रक्कमही लंपास केली. यासंदर्भात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच चोरट्यांचा शोध घेऊ असे डोंबिवली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्याकडून सांगण्यात आले मात्र पोलीस स्टेशन समोरील दुकानात चोरी करत चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे.

नेमंक काय घडलं ?

डोंबिवली पूर्व येथील रामनगर पोलीस ठाणे तसेच उपशहर वाहतूक कार्यालयाच्या समोर गणेश इलेक्स्ट्रिक हे मोबाईलचे दुकान आहे. या दुकानात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. चोरट्यांनी दुकानाच्या छताला भगदाड पाडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील 7 महागडे मोबाईल व 60 हजाराची रोख रक्कम चोरून ते पसार झाले. दुकानातील मेहक सिंग यांनी ही माहिती दिली आहे. मोबाईलच्या या दुकानात रोज रात्री काही कामगार झोपतात, पण गेल्या काही दिवसांपासून दुकानात कोणी झोपत नव्हते असेही सिंग यांनी नमूद केले.

समोर पोलिस स्टेशन असूनही चोरट्यांनी बिनधास्सपणे दुकान फोडून त्यातील मोबाईल्स आणि रोख रक्कमही लांबवली. याप्रकरणी दुकान मालकाच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. मात्र पोलीस स्टेशन समोरील दुकानातच चोरी करत चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.