आई गं… काळजाचा ठोका चुकला… चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अ‍टॅक, ताबा सुटलेली बस सैरावैरा धावली; अन्…

| Updated on: Dec 31, 2022 | 8:29 AM

हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे बस सैरावैरा धावली आणि कारला जाऊन धडकली. त्यामुळे नऊ लोकांचा जागीच मृत्यू झाला.

आई गं... काळजाचा ठोका चुकला... चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अ‍टॅक, ताबा सुटलेली बस सैरावैरा धावली; अन्...
चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अ‍टॅक, ताबा सुटलेली बस सैरावैरा धावली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवसारी: गुजरातच्या नवसारी येथे आज सकाळी मोठी आणि भीषण दुर्घटना घडली. बस आणि कारची समोरासमोर धडक पसली आणि या अपघातात 9 जण जागीच ठार झाले. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 48 येथील वेसमा गावाजवळ हा अपघात झाला. बस चालवत असताना ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला. त्यामुळे त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बसने थेट कारलाच धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन कार आणि बसच्या दरम्या फसलेल्या लोकांना बाहेर काढलं. यातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करणअयात आलं.

हे सुद्धा वाचा

तसेच अपघातातील नऊही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे दोन्ही वाहनांमध्ये फसलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी वाहनांचे पत्रे कापावे लागले. त्यामुळे जखमींना मदत करण्यात वेळ लागला.

अपघातानंतर वाहतूक कोंडी

पहाटे झालेल्या या अपघातानंतर हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे लांबचा प्रवास करणारे प्रवासी चांगलेच वैतागले आहेत. पोलिसांनी जखमींना आणि मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत. सध्या बस आणि कार रस्त्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आले आहेत.

क्रेनच्या सहाय्याने ही दोन्ही वाहने बाजूला केली जाणार आहेत. मात्र, वाहतूक कोंडीतून मार्ग काढता काढता पोलिसांच्याही नाकीनऊ आले आहेत. या शिवाय घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.

थंडीमुळे हृदयविकाराचा झटका?

या बस चालकाला आधीपासूनच हृदयविकार होता. मात्र, त्याने जेव्हा गाडी डेपोतून काढली तेव्हा त्याची प्रकृती ठणठणीत होती. मात्र, भल्या पहाटे कडाक्याची थंडी असल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा, असं सांगितलं जात आहे.

हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे बस सैरावैरा धावली आणि कारला जाऊन धडकली. त्यामुळे नऊ लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले असल्याचं पोलिसांनी सांगितलं.