Sanjay Raut: पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत हे सक्रीय षडयंत्रकार असल्याचा ईडीचा दावा, राऊत यांच्या फ्रंट मॅनला 112 कोटी मिळाल्याचा दावा

| Updated on: Aug 02, 2022 | 5:08 PM

ईडीने दाखल कलेलेल्या अर्जात अनेक महत्त्वाचे दावे करण्यात आले आहेत. संजय राऊत यांच्या परिवाराचा देश-विदेशातील सुट्ट्यांचा खर्च अनेकदा प्रवीण राऊत याने केल्याचा या अर्जात उल्लेख करण्यात आला आहे. तर आपल्याविरोधात करण्यात आलेली कारवाी की राजकीय बदला असल्याचा दावा कोर्टात संजय राऊत यांनी केला आहे. कोर्टात ईडीने संजय राऊत यांची 8 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने ती मागणी अमान्य करत राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी दिली आहे.

Sanjay Raut: पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत हे सक्रीय षडयंत्रकार असल्याचा ईडीचा दावा, राऊत यांच्या फ्रंट मॅनला 112 कोटी मिळाल्याचा दावा
संजय राऊत
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : मुंबईतील पत्रा चाळ पुनर्विकास( Patra Chaal case) भ्रष्टाचार प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay raut) यांना ईडीने अटक केली असून, 4 ऑगस्ट पर्यंत त्यांना ईडी कस्टडी मिळाली आहे. 1039 कोटी 79 लाख रुपयांचा हा गैरव्यवहार आहे. या प्रकरणात ईडीने कोर्टात दाखल केलेल्या रिमांड अर्जानुसार, या घोटाळ्यात संजय राऊत हे सक्रिय षडयंत्र रचणारे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला प्रवीण राऊत, हा संजय राऊत यांचा फ्रंट मॅन असल्याचा दावाही करण्यात आलेला आहे. प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांची एकमेकांसमोर चौकशी होणार असल्याची शक्यता आहे. या प्रकरणात मुंबईत ईडीने दोन ठिकाणी छापेमारीही केलेली आहे.

काय आहे ईडीच्या रिमांड अर्जात?

ईडीने दाखल कलेलेल्या अर्जात अनेक महत्त्वाचे दावे करण्यात आले आहेत. संजय राऊत यांच्या परिवाराचा देश-विदेशातील सुट्ट्यांचा खर्च अनेकदा प्रवीण राऊत याने केल्याचा या अर्जात उल्लेख करण्यात आला आहे. तर आपल्याविरोधात करण्यात आलेली कारवाी की राजकीय बदला असल्याचा दावा कोर्टात संजय राऊत यांनी केला आहे. कोर्टात ईडीने संजय राऊत यांची 8 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने ती मागणी अमान्य करत राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी दिली आहे.

प्रवीण राऊतच्या कंपनीने 16 बिल्डरांना विकली जमीन

म्हाडाच्या जमिनीवरील एफएसआय अनधिकृतरित्या घेतल्यानंतर, गुरु आशिष कंपनीने गतीने ही जमीन इतर 16 बिल्डरांना विकली. या गुरु आशिष कंपनीत प्रवीण राऊत एक संचालक आहेत. यामुळे या कंपनीला मोठा आर्थिक लाभ झाला आहे. असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. हा प्रकल्प आत्तापर्यंत केवळ 10 टक्के पूर्ण झाला आहे. हा पूर्ण करण्यासाठी गुरु आशिष कंपनीला मोठ्या आर्थिक रकमेची गरज आहे. मात्र आता ही कंपनी आणि पकल्प दिवाळखोरीत गेल्याचे घोषित केला जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

अनधिकृतरित्या जमीन विकल्याने मिळाले 112 कोटी

पत्रा चाळीत राहणाऱ्या रहिवाशांनी म्हाडा आणि गुरु आशिष कंपनीसोबत ट्रिपल एग्रिमेंट केले होते, असा ईडीचा दावा आहे. या एग्रिमेंटमध्ये गुरु आशिष कंपनीचा संचालक प्रवीण राऊत याची महत्त्वाची भूमिका होती. ओरिजनल एग्रिमेंटनुसार, गुरु आशिष कंपनी, म्हाडाची जमीन कोणत्याही तिसऱ्या पक्षाला विकू शकत नाही. असा करार झालेला असतानाही ही जमीन फसवून विकण्यात आली. या व्यवहाराच्या बदल्यात हाऊसिंग डेव्हलपमेंट एन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) कंपनीकडून प्रवीण राऊत यांना 2010 -11 साली 112 कोटी रुपये मिळाले. बेकायदेशीररित्या हे पैसे घेतल्यानंतर, या पैसे पत्रा चाळ परियोजनेत गुंतवण्याऐवजी गुरु आशिष कन्सट्रक्शन प्रा. लिमिटेड कंपनीने पैसे काढून घेतले. प्रवीण राऊत यांनी या योजनेत पैशांची गुंतवणूक केली नाही. असा दावा ईडीने केलेला आहे.

संजय राऊत यांच्यासह रचण्यात आला कट

संजय राऊत, प्रवीण राऊत, राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांनी एकत्र हा कट रचला असा दावा ईडीने केलेला आहे. ही योजना पूर्ण करण्याऐवजी 672 कुटुंबांचे भविष्य अंधारात आणून, यातून पैसे काढण्याचा कट करण्यात आला. असा ईडीचा दावा आहे. संजय राऊत यांच्याव्यतिरिक्त तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या 112 कोटी रुपयांना वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. यातील काही पैशांतून वेगवेगळ्या मालमत्ता खरेदी करण्यात आल्या. या प्रकरणात 5 एप्रिल 2022 रोजी प्रवीण राऊत, वर्षा राऊत, स्वप्ना पाटकर यांच्यावर असलेली 11 कोटी 51 लाख 56 हजार 573 रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. या सगळ्यांनी भाडेकरु, म्हाडा आणि एफएसआय खरेदी करणाऱ्या बिल्डरांची फसवणूक केली.

राऊत आणि त्यांच्या पत्नीला मिळाले 1 कोटींहून अधिक

या 112 कोटींपैकी 1  कोटी 6 लाख 44 हजार 375  रुपये हे संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले, असे तपासात निष्पन्न झाल्याचेही कोर्टात ईडीने सांगितले आहे.

संजय राऊत यांच्या जवळचे असल्याने प्रवीण यांना परवानग्या

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे विश्वासपात्र आणि सहकारी होते. या प्रकरणातील साक्षीदारांनुसार, फ्रंटमन असल्याच्या नात्याने, प्रवीण राऊत याने संजय राऊतांशी असलेल्या जवळकीचे संबंध म्हाडाकडून परवानग्या मिळवण्यासाठी आणि इतर लाभांसाठी वापरल्याचे तपासात समोर आल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

प्रवीण राऊतच्या पत्नीशी वर्षा राऊत यांची ओळख

संजय राऊत यांनी पीएमएलएच्या कलम 50 अन्वये, दाखल कलेल्या जबाबादत चाळ परियोजनेत प्रीण राऊत सहभागी होते, याची माहिती नसल्याचा दावा केला आहे. ईडीने ही माहिती दिली आहे. प्रवीम राऊत याच्या संपर्कात 2012-13 साली आल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत याच्या पत्नीची ओळख होती. त्यामुळे ते प्रवीण राऊत याला भेटले असे सांगण्यात आले आहे. पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याच्या प्रकरणी विचारणा केली असता, राऊत कायदेशीर कारण देऊ शकले नाही, असे ईडीचे म्हणणे आहे. त्याचसोबत मालमत्ता खरेदी-विक्रीबाबतची कागदपत्रेही ते सादर करु शकले नसल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

2010 साली संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे 10 जमिनींची खरेदी

रिमांड कॉपीनुसार, तपासात हेही समोर आले आहे की, या पुनर्विसाक प्रकल्पाच्या काळात, संजय राऊत यांच्या पत्नीची कंपनी अवनी इन्फ्रास्ट्रक्चरने 2010-11 या काळात अलिबागच्या किहिम बीचवर 8 कान्ट्रक्ट करत 10 जमिनी खरेदी केल्या. हे कॉन्ट्रॅक्ट वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावे करण्यात आले. पाटकर यांनी या प्रकरणात दिलेल्या जबाबानुसार, या जमिनी खरेदी करताना, विक्रेत्यांना रोख पैसे देण्यात आले होते आणि या रोख रकमेचा स्रोत प्रवीण राऊत होते. ज्यावेळी अवनी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी स्थापन करण्यात आली, त्यावेळी वर्षा राऊत या शिक्षिका होत्या आणि प्रवीम राऊत याची पत्नी माधुरी राऊत या गृहिणी होत्या. वर्षा राऊत यांना या कंपनीत 5625 रुपयांच्या गुंतवणुकीच्या मोबदल्यात 13लाख 95 हजार 611 रुपये मिळाले.

संजय राऊत यांना प्रवीणकडून मिळत होते दरमहा 2 लाख रुपये

ईडीने हाही दावा केला आहे की, प्रवीण राऊत हा संजय राऊत यांना दरमहा 2 लाख रुपये रोख देत होता. संजय राऊत यांनी किहिम बीचवर जमीन विकणाऱ्यांना आणि ईडीसमोर साक्ष देणाऱ्यांना धमकावले होते, असेही ईडीचे म्हणणे आहे.