पलंगाखाली पैसेच पैसे! 10 ट्रंकमध्ये तब्बल 17 कोटी, एवढं घबाड घरात लपवणारा आमीर खान आहेत तरी कोण? जाणून घ्या

| Updated on: Sep 11, 2022 | 2:01 PM

E-nuggets Application : Who is Amir Khan? : ई-नगेट्स ज्यांनी डाऊनलोड केलं होतं, त्या युजर्सना कमिशनचे पैसे बक्षीस म्हणून देण्यात आलं. शिवाय लोकांना हे पैसे विड्रॉही करता येत होते. विश्वास बसल्यानंतर लोकांनी मोठी गुंतवणूक ई-नगेट्स ऍपमध्ये केली.

पलंगाखाली पैसेच पैसे! 10 ट्रंकमध्ये तब्बल 17 कोटी, एवढं घबाड घरात लपवणारा आमीर खान आहेत तरी कोण? जाणून घ्या
कोण आहे महाठग आमीर खान?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई ईडीने (ED Kolkata News) शनिवारी केली. एका व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकला. या छापेमारीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भलीमोठी कॅश जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रक्कम तब्बल 17 कोटी रुपये असल्याचं समोर आलं आहे. एका पलंगाखालून कोट्यवधी रुपयांचं घबाड जप्त करण्यात आलं.

आमीर खान (Amir Khan) नावाच्या व्यावसायिकाच्या घरात ही छापेमारी करण्यात आली होती. 10 ट्रंकमध्ये मिळून एकूण 17 कोटी रुपये आतापर्यंत जप्त (Huge cash seized) करण्यात आलेत. त्यात पाचशे रुपयांचे शेकडो बंडल आढळून आले. दोनशे रुपयांच्याही नोटांचे बंडल असून काही बंडल दोन हजार रुपयांचेही होते. पण मोठ्या प्रमाणात पाचशेच्याच नोटा असल्याचं दिसून आलं.

आमीर खान या व्यावसायिकाने नेमकं एवढं घबाड जमवलं कसं, याचीही माहिती आता समोर आली आहे. एका मोबाईल ऍपच्या माध्यमातून आमीरने लोकांना गंडा घातला. त्यानंतर लोकांकडे असलेले पैसे उकळले आणि नंतर मोबाईल ऍप्लिकेशनच बंद करुन टाकलं. त्यामुळेच या प्रकरणाचा उलगडा झालाय.

हे सुद्धा वाचा

कोण आहे आमीर खान?

या आमीर खानचा आणि परफेक्शनिस्ट अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानचा काडीमात्र संबंध नाही. ईडीने ज्या व्यावसायिकावर कारवाई केली, त्या व्यावसायिकाचं नाव योगायोगाने आमीर खान असल्याचं समोर आलं. या ठग आमीर खानच्या घरात ईडीने शनिवारी छापा टाकला. छापेमारीत जे घबाड हाती लागलं, ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले.

ट्रंकमधून, पलंगाखालून जबरदस्त कॅश जप्त करण्यात आली. तब्ब 17 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड आमीरने कमावली कशी, याचाही उलगडा करण्यात आला आहे. एक मोबाईल ऍप आमीरने तयार केलं. ई-नगेट्स असं या मोबाईल एप्लिकेशनचं नाव होतं. लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशानेच हे मोबाईल ऍप आमीरने तयार केलं होतं. ईडीने या कारवाईनंतर आमीरने नेमकं काय करुन एवढं घबाड जमवलं, याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यातून आमीरच्या मोड्स ऑपरेंडीचा खुलासा झालाय.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ई-नगेट्स ज्यांनी डाऊनलोड केलं होतं, त्या युजर्सना कमिशनचे पैसे बक्षीस म्हणून देण्यात आलं. शिवाय लोकांना हे पैसे विड्रॉही करता येत होते. विश्वास बसल्यानंतर लोकांनी मोठी गुंतवणूक ई-नगेट्स ऍपमध्ये केली. जास्त कमिशन मिळेल म्हणून लोक आमीषाला बळी पडले. पण पुढे जाऊन आपलं खातं खाली होऊ शकतं, याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती.

मोठ्या प्रमाणात लोकांनी आर्थिक उलाढाल ऍपमध्ये केल्यानंतर आमीर खानने डाव साधला. लोकांकडून मोठी रक्कम गोळी केली आणि त्यानंतर ऍप अपडेट करण्याच्या उद्देशाने ऍपमधून पैसे विड्रॉ करण्याचा ऑप्शनच बंद करुन टाकला. बरेच दिवस पैसे विड्रॉ करण्याचा ऑप्शन सुरु होत नाही, म्हणून युजर्स त्रस्त झाले. अखेर हा सगळा फसवणुकीचा प्रकार होता, हे उघडकीस आलं.

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच आमीर खान विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता जवळपास दीड वर्षांनी या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत आमीरला अटक करण्यात आली आहे. शिवाय फसवणुकीने कमावलेली कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

हे सगळं प्रकरण गंभीर असल्याचं तेव्हा लक्षात आलं, जेव्हा ऍपमधून युजर्सची सगळी माहिती डिलीट झाल्याचं समोर आलं. एक दिवस अचानक या मोबाईल ऍपच्या सर्व्हरमधूनच सगळीच्या सगळी माहिती गायब करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण किती भयंकर आहे, याची चर्चा रंगू लागली.

दरम्यान, शनिवारी या संपूर्ण प्रकरणाचा तपास म्हणून आमीरच्या कोलकातामधील घरात छापा टाकण्यात आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. एकूण सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली. फ्रॉड गेमिंग ऍप्लिकेशन म्हणून लोकांना गंडा घालणाऱ्या आमीरचं धाबं दणाणालं. फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या अकाऊंटमधून या ऍपचे सगळे व्यवहार करण्यात आले असल्याचं ईडीच्या तपासातून समोर आलंय.