Beed Crime Govind Barge Death : गोविंद बर्गेप्रकरणातील नर्तकी पूजाचा नवा कारनामा, लॉज कनेक्शन आले समोर

Dancer Pooja Gaikwad : माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर पूजा गायकवाड हिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. गोविंदसोबत प्रेमसंबंध असल्याचे तिने याआधी कबूल केले होते, आता पोलिसांच्या तपासातून आणखी एक खळबळजनक खुलासा झाला आहे.

Beed Crime Govind Barge Death : गोविंद बर्गेप्रकरणातील नर्तकी पूजाचा नवा कारनामा, लॉज कनेक्शन आले समोर
गोविंद बर्गेप्रकरणातील नर्तकी पूजाचा नवा कारनामा
| Updated on: Sep 16, 2025 | 11:07 AM

कलाकेंद्रात नृत्य करणारी पूजा गायकवाड हिच्या प्रेमात वेड्या झालेले बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमासलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यूप्रकरणात रोड नवनवी माहिती समोर येत आहे. 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या पूजाची (Pooja Gaikwad) कसून चौकशी करण्यात येत असून तिचे व मृत गोविंद बर्गे यांचे कॉल रेकॉर्ड्स तसेच चॅट्सही पोलिसांकडून तपासण्यात आले आहेत. आणि त्यातूनहीी बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोविंद बर्गे हे कला केंद्रात गेल्यावर तिथे पूजाशई ओळख झाली, ती वाढली . पण पूजा आणि गोविंद यांचं नातं फक्त डान्सर आणि कस्टमर असं नव्हे तर त्यापुढे गेलं होतं.

गोविद हे पूजाच्या प्रेमात पडला आणि पूजानेही त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवले. आमच्या दोघांचे प्रेमसंबंध होतं असं पूजाने याआधीच कबूल केलं होतं. मात्र आता तिच्या चौकशीतून नवनवी, धक्कादायक माहितीदेखील समोर येत आहे.

Beed Crime Govind Barge Death : चॅटिंगदरम्यान अनेकदा दिली धमकी, गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा
कधी फ्लॅट, तर कधी लॉजवर भेटायचे आणि…

गोविंद आणि पूजा यांच्यात प्रेमसंबध सुरू झाले. ते कॉलवर बोलायचे तसेच व्हॉट्सॲपवर वगैरे चॅटिंगही व्हायचं. एवढंच नव्हे तर ते कलाकेंद्राव्यतिरिक्तही अनेक ठिकाणी भेटायचे.कधी ते दोघे घरी तर कधी फ्लॅटवर भेटायचे. एवढंच नव्हे तर कधीकधी पूजा आणि गोविंद हे बीडमध्ये किंवा काहीवेळेस तर ते वैराग परिसरातील वेगवेगळ्या लॉजवरही सोबत रहायचे. पोलिसांच्या चौकशीत पूजानेच या सगळ्या गोष्टी कबूल केल्या आहेत.

Beed Crime Govind Barge Death : जिच्या प्रेमात दिला जीव तिच्यासाठी गोविंद फक्त… पूजा गायकवाडची अख्खी कुंडलीच समोर ! नातं कसं झालं सुरू ?

मागण्या मान्य न झाल्याने पूजाने केलं ब्लॅकमेल, धमक्याही दिल्या

मृत गोविंद बर्गे पूजाच्या प्रेमात वेडा झाला होता. वर्षभराच्या काळात त्याने तिला पैसा, अडका, जमीन, दागिने, महागडे मोबाईल घेऊन दिले. तसेच तिचं घर घेण्यासाठीही त्याने आर्थिक मदत केल्याचे समोर आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने गेवराईच्या बंगल्यासाठी तगादा लावला आणि गोविंदच्या नावे असलेली जमीन भावाच्या नावे करण्याचीही तिची मागणी होती. गोविंद ऐकत नाही म्हटल्यावर तिने त्याच्याशी संपर्क तोडला, त्याला ब्लॅकमेलही करू लागली. यामुळेच निराश होऊन, तणावातून गोविंद सासुरे गावात पूजाला भेटायला गेला, तिथेही ती न भेटल्याने त्याने अखेर कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं.

पण गोविंदचे मित्र, नातेवाईक यांनी मात्र आत्महत्येचा हा दावा फेटाळून लावला आहे. गोविंदकडे साधी काठी नव्हती, पिस्तुल कुठून येणार असा सवाल विचारत त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून पूजा गायकवाड हिची चौकशी तर सुरू आहेच, त्यासोबतच तिचे सहकारी, आणि तिच्या मैत्रिणींचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.