AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पप्पा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, तेव्हा राकेश अंकल आणि आई….’, मुलीकडून सत्य ऐकून हादरला डॉक्टर

Love Affair | डॉक्टर एकदिवस अचानक अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरला, बाहेरुन रुमला टाळ लावलं. या घरात जे घडलं, त्यामुळे कोणाचाही नात्यावरचा विश्वास उडू शकतो. नवरा डॉक्टर, बायको शिक्षिका, घरात दोन मुलं.

'पप्पा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, तेव्हा राकेश अंकल आणि आई....', मुलीकडून सत्य ऐकून हादरला डॉक्टर
extramarital affair Accused
| Updated on: Sep 22, 2023 | 1:00 PM
Share

लखनऊ : नवरा-बायकोच नातं विश्वासाच्या पायावर उभं असतं. या विश्वासाला तडा गेला की, संसाराची इमारत जोरात खाली कोसळते. एका चांगल्या, सुशिक्षित घरात जे घडलं, त्यामुळे कोणाचाही नात्यावरचा विश्वास उडू शकतो. नवरा डॉक्टर, बायको शिक्षिका, घरात दोन मुलं. मोठा मुलगा 16 वर्षाचा, मुलगी 6 वर्षांची. एका चांगल्या शिकल्या, सवरलेल्या कुटुंबता असं काही होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण सध्याच्या जमान्यात काहीही घडू शकतं. डॉक्टरला त्याच्या 6 वर्षाच्या मुलीने जे सांगितलं, ते ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमनीनच सरकली. आपली सुशिक्षित शिक्षिका असलेली पत्नी असं काही करेल असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. या प्रकरणातील डॉक्टर सरकारी रुग्णालयात नोकरीला आहे. तो दररोज सकाळी लवकर ड्युटी असल्याने घर सोडायचा. मुलगा शाळेत निघून जायता. मुलगी शाळेतून घरी लवकर यायची.

एक दिवस मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं की, “पप्पा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, तेव्हा राकेश अंकल घरी येतात. त्यांच्यासोबत मम्मी आपल्याच घरातील एक रुमममध्ये जाते. जेव्हा मी काही कामासाठी मम्मीकडे जाते, तेव्हा राकेश अंकल मला किस करतात आणि धमकावतात. या बद्दल कोणाजवळ काही बोललीस, तर तुला जीवानिशी संपवीन. राकेश अंकल धमकी देतात, तेव्हा मम्मी तिथेच असते. पण ती काही बोलत नाही” आपल्या मुलीच्या तोंडून हे सगळ ऐकून डॉक्टरला धक्का बसला. मुलगी जे सांगतेय ते खरं आहे की, नाही हे तपासण्यासाठी एक दिवस डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडला. काही अंतरावर गेल्यानंतर तो अचानक माघारी फिरला. पत्नी आणि राकेशला रंगेहाथ पकडल्यानंतर डॉक्टरने काय केलं?

घरी येऊन त्याने आपल्या डोळ्याने पाहिलं. मुलीने सांगितलेला प्रत्येक शब्द ना शब्द खरा होता. घरातील रुममध्ये त्याने पत्नी आणि तिचा मित्र राकेश यांना रंगेहाथ पकडलं. डॉक्टर रुमच्या बाहेर आला व त्याने बाहेरुन टाळ लावलं. पत्नी आणि तिचा प्रियकर राकेश अचानक डॉक्टरला समोर पाहून गडबडले. दरवाजा उघडण्यासाठी दोघे डॉक्टरला शिव्या देत होते. डॉक्टरने 112 नंबर डायल करुन पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी राकेशला अटक केली. त्याच्यावर विविध कलमातंर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.