AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : मालाडमधील ‘त्या’ दरोड्याचा मास्टरमाईंड सापडला, घाटकोपरच्या लेडी डॉनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मालाडमध्ये झालेल्या ७५ लाख रुपयांच्या लुटीमुळे संपूर्ण शहर हादरलं होतं. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हा गुन्हा घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अथक तपास करून आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्यामागे कोणाचा हात आहे, ते स्पष्ट झाले.

Mumbai Crime : मालाडमधील 'त्या' दरोड्याचा मास्टरमाईंड सापडला, घाटकोपरच्या लेडी डॉनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
| Updated on: Sep 22, 2023 | 11:45 AM
Share

मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मालाडमध्ये (malad robbery) घडलेल्या थरारक लुटीने सर्वच हादरले होते. या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी आठवड्याभरानंतर ७ आरोपींना अटक केली होती. मात्र या दरोड्यामागचा मास्टरमाईंड कोणी वेगळाच होता. अखेर या गुन्ह्यात ‘गॉडमदर’ लेडी डॉन करीना शाह उर्फ आपा हिचा हात असल्याचे समोर आले असून पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. मालाडच्या मार्वे रोडवरील एका फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीतून जमा झालेले 75 लाख रुपये ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लुटण्यात (robbingg cash) आले होते. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ (crime news) उडाली होती. अखेर पोलिसांनी या संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावला आहे.

करीमा शाह उर्फ आपा ही घाटकोपरची मोस्ट वॉण्टेड लेडी डॉन असून या दरोड्यात तिचा सहभाग आढळून आल्याने या घटनेला वेगळेच वळण मिळाले आहे. दरोडा टाकणाऱ्या आरोपींनी लुटलेल्या रकमेपैकी काही रक्कम ही करीमा आपाकडे पाठवली होती. आरोपी तुरूंगात गेल्यास जामीनाची व्यवस्था करणे, वकीलांची नियुक्ती करणे वगैरे कामांसाठी एक तृतीयांश रक्कम तिला देण्यात आली होती.

एका बांधकाम साइटच्या सुपरवायझरने नोंदवलेल्या तक्रारीनंतर खंडणीच्या गुन्ह्यात पंत नगर पोलीस करीमा हिच्या शोधात होते. तिच्या विरुद्ध पंत नगर पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली डझनभर गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच खंडणीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यामध्ये ती वॉन्टेड आहे, असेही पोलिसांनी सांगितले

मालाडमधील दरोड्याचा थरार

28 ऑगस्टच्या रोजी रात्री मालाडमधील फॉरेक्स कंपनीचे दोन कर्मचारी , प्रतीक भोजाने आणि गणेश तळवळकर हे दोन बॅगांमधील असलेली 50 लाख आणि 25 लाखा रुपये अशी एकूण 75 लाखांची रोकड घेऊन रिक्षातून जात होते. भाविक पटेल यांच्या मार्वे रोड येथील निवासस्थानी ही रोकड पोहोचवायची होती. मात्र ते पटेल यांच्या बिल्डींगजवळ पोहोचले असता, दुचाकीवरून तिघे जण आले. त्यापैकी दोघांनी त्या कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत दोन्ही बॅगा हिसकावून घेतल्या आणि ते फरार झाले. एकूण 75 लाख रुपये लुटण्यात आले होते.

कंपनीच्या मलाकाने नोंदवलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासातून मिळालेल्या लीड्सवर काम करणाऱ्या पथकांवर सुपरव्हिजन केली आणि अखेरीस लोणावळा, पुणे, नाशिक, रायगड, जालना आणि मुंबई येथून सात आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींमधील एक जण हा कंपनीचाच कर्मचारी असल्याचेही उघड झाले. त्याचाही लुटीत सहभाग होता. अभय गायकवाड, त्याचा भाऊ कुणाल गायकवाड, नरेश राठोड, छगन गायकवाड, दिनेश इंद्रे, विनोद अचलखांब आणि प्रतीक भोजाने या आरोपींना अटक करण्यात आली.

आत्तापर्यंत महाराष्ट्रातील विविध गावातून एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली असून लुटीपैकी निम्मी रक्कम हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता लेडी डॉन करीमा हिच्या सांगण्यावरून हा दरोडा टाकल्याचे समोर आले. त्यांनी तिला काही रक्कमही ट्रान्सफर केली होती. त्यानंतर पोलिसांनी करीमा हिला अटक केली.

करीमा हिच्यावर मुंबईतील पूर्व उपनगरात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून पंतनगर कामराज नगर मध्ये तिची खूपच दहशत आहे. खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी टोळ्या चालवणे, बेकायदेशीर झोपड्या बांधून विकणे यासारखे अनेक गुन्हे तिच्यावर दाखल आहेत.पोलिसांनी तिला अटक करून चौकशी सुरू केली आहे. मात्र तिला मिळालेल्या पैशांबद्दल तिने जराही तोंड उघडलेलं नाही.

लेडी डॉनचा इतिहास

जेमतेम चार बुकं शिकलेली करीमा ही घाटकोपर मध्ये ‘गॉडमदर’ म्हणून ओळखली जाते. तिने तिच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात घाटकोपरमध्ये झोपड्या बांधून बेकायदेशीर विकासक म्हणून केली. गेल्या अनेक वर्षांत तिचा प्रभाव आणि तिचे शत्रू बरेच वाढले आहेत. स्वत:चे आणि पतीचे संरक्षण करण्यासाठी, तिने तेथील स्थानिक गुंडाला कामावर ठेवले. त्या बदल्यात, तो गुंड व त्याच्या साथीदारांना सुखसोयीयुक्त जीवन जगता येईल, याची तिने काळजी घेतली. लवकरच, परिसरातील लोकांना करीमाची भीती वाटू लागली; ते तिला आदराने आपा म्हणायचे आणि त्यांचे वाद मिटवण्यासाठी तिच्याकडे घेऊन जाऊ लागले. कामराज नगर येथील निवासस्थानी तिने एक दरबार स्थापन केला, जिथे ती स्थानिकांची भांडणं सोडवायची, असे पोलिसांनी सांगितले.

तिचे मनुष्यबळ वाढवण्यासाठी करीमाने परिसरातील अनाथ मुलांना दत्तक घेण्यास सुरुवात केली. तिने त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली.  आणि त्या बदल्यात ती मुलं तिच्या इशाऱ्यावरून चोरी, दरोडे आणि चेन स्नॅचिंग करून चोरीचा सर्व ऐवज करीमाकडे जमा करायची.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.