AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Tariff Announcement : आता चीनने लावला प्रचंड टॅरिफ, मोठी घोषणा, काय होणार परिणाम?

मोठी बातमी समोर येत आहे, आता चीनकडून देखील टॅरिफची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे टॅरिफ वॉर आणखी भडकण्याची शक्यता असून, याचा मोठा परिणाम हा जगतिक बाजारावर होऊ शकतो.

New Tariff Announcement : आता चीनने लावला प्रचंड टॅरिफ, मोठी घोषणा, काय होणार परिणाम?
चीनचा मोठा निर्णय Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 22, 2025 | 9:44 PM
Share

टॅरिफ युद्ध आता चांगलंच भडकलं आहे. अमेरिकेमधून टॅरिफ वॉरची सुरुवात झाली होती. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारत आणि चीनवर टॅरिफ लावला होता, गेल्या ऑगस्ट महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या टॅरिफ धोरणाची घोषणा करतानाच भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला. सध्या अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतो, त्याचा फायदा हा रशियाला युद्ध फंडसाठी होत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा निर्यातीला मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे मॅक्सिकोने देखील भारतासह आशिया खंडातील प्रमुख देशांवर आता 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जानेवारीपासून मॅक्सिको टॅरिफ लावणार आहे, दरम्यान हे टॅरिफ वॉर सुरू असतानाच आता चीनने देखील मोठी घोषणा केली आहे, चीनने नव्या टॅरिफची घोषणा केली आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

चीनकडून EU अर्थात युरोपीयन यूनियन अंतर्गत येणाऱ्या सर्व देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनकडून युरोपियन यूनियनमध्ये येणाऱ्या देशांकडून निर्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या डेरी प्रोडक्टवर 42.7 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत बोलताना चीनच्या उच्चस्थरीय अधिकार्‍यांनी माहिती दिली आहे. युरोपियन यूनियन अंतर्गत येणार्‍या देशांच्या प्रोडक्टमुळे चीनच्या डेअरी उत्पादनाला मोठा फटका बसत आहे, यामुळे चीनचं मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे चीनने आता या उत्पादनावर 42.7 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. चीनच्या या नव्या निर्णयामुळे आता जगभरात टॅरिफचं युद्ध आणखी भडकणार असल्याचं बोललं जात आहे.

युरोपियन यूनियनमध्ये येणाऱ्या देशांना तेथील सरकारकडून डेअरी प्रोडक्टवर मोठ्या प्रमाणात सबसीडी दिली जाते, त्यामुळे त्यांची उत्पादनं चीनमध्ये स्वस्त विकली जातात, त्याचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसत आहे. चीनमधील लोकल कंपन्या यामुळे तोट्यात जात असून, अनेक कंपन्या बंद करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं चीनने स्पष्ट केलं आहे. येत्या 23 एप्रिलपासून चीनचा हा नवा टॅरिफ लागू होणार आहे, याचा मोठा फटका हा निर्यातीवर होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ