कस्टम अधिकारी असल्याचे भासवून चक्क पोलीस पत्नीलाच गंडवले, काय आहे प्रकरण?

| Updated on: May 12, 2023 | 7:47 PM

त्या दोघांची सोशल मीडियावर मैत्री झाली. त्याने कस्टम विभागात कार्यरत असल्याचे सांगितले. पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असलेल्या तिला त्याच्यावर विश्वास बसला, पण मग जे घडले त्याने सर्वांनाच धक्का बसला.

कस्टम अधिकारी असल्याचे भासवून चक्क पोलीस पत्नीलाच गंडवले, काय आहे प्रकरण?
नर्सिंगला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : कस्टम अधिकारी असल्याचे भासवून पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीला गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वस्त दरात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवत पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची 3.6 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मनिषा अनिल कारे असे लुटण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, ती एमआरए मार्ग पोलीस कॉलनीत राहते. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव नरडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

सोशल मीडियावर झाली मैत्री

मनिषा कारे आणि वैभव नरडे यांची सोशल मीडियावर मैत्री झाली होती. नरडे याने आपण कस्टम अधिकारी असल्याचे मनिषाला सांगितले होते. दोघेही एकमेकांसोबत सोशल मीडियावर चॅट करायचे. यावेळी वैभवने केस सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला सोने बक्षिस मिळते असे, मनिषाला सांगितले.

स्वस्तात सोनं देण्याचे आमिष दाखवत फसवणूक

काही दिवसांनी वैभवने मनिषाला बक्षिस मिळालेले सोने आपल्याला विकायचे असल्याचे सांगितले. तसेच ते सोने स्वस्त दरात विकायचे असल्याचे सांगताच मनिषाने ते सोने खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर आरोपीने पीडितेला 9 तोळे सोन्यासाठी 3.5 लाख रुपये देण्यास सांगितले. महिलेलाही हा व्यवहार मान्य होता. त्यानुसार महिलेने 11 एप्रिल रोजी नरडे याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले.

हे सुद्धा वाचा

खात्यात पैसे येताच नरडेने महिलेला टाळण्यास सुरुवात केली. महिलेने फोन केल्यास आरोपी फोनलाही प्रतिसाद देत नव्हता. अखेर आपली फसवणूक झाली असल्याचे महिलेच्या लक्षात आले. यानंतर तिने एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी संबंधित कलमानुसार वैभव नरडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा पती मुंबई पोलिसात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे.