AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी केली, संतापलेल्या पतीने थेट…

त्याने पत्नीकडे नको ती मागणी केली. याची माहिती मिळताच महिलेचा पती संतापला. मग रागाच्या भरात जे घडले ते भयंकर होते.

पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी केली, संतापलेल्या पतीने थेट...
शरीरसुखाला नकार देणाऱ्या पत्नीला पतीने संपवलेImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 12, 2023 | 6:13 PM
Share

मुंबई : महिलेकडे नको ती मागणी करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. महिलेच्या पतीने अन्य दोघांच्या मदतीने व्यक्तीची हत्या केल्याची घटना मुंबईतील वरळी परिसरात घडली आहे. राजन दास उर्फ बंगाली असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी तीन जणांविरोधात कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन कवंदर, सदा कवंदर आणि भावेश साळवे अशी तिघा आरोपींची नावे आहेत. मयताचे आरोपीच्या पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी केली होती. यामुळे महिलेच्या पतीचे त्याचा कायमचा काटा काढला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याने पती संतापला

राजन दास हा आरोपीच्या पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी करत होता. त्या बदल्यात त्याने महिलेला 500 रुपये देऊ केले. महिलेने ही बाब आपल्या पतीला सांगितली. हे ऐकताच पतीला संताप अनावर झाला. त्याने आपला भाऊ आणि भाचा यांना सोबत घेऊन राजनच्या घरी गेले आणि त्याला बेदम मारहाण केली. यात राजनचा मृत्यू झाला.

आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल

हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी राजनला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?