राज ठाकरेंच्या संकल्पनेतून उभारलेले बोटॅनिकल गार्डन पाहणं पडलं महागात

बोटॅनिकल गार्डनची कलाकृती जगभरात पर्यटकांना भुरळ घालणारी असून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येकाला ते बघावेसे वाटते.

राज ठाकरेंच्या संकल्पनेतून उभारलेले बोटॅनिकल गार्डन पाहणं पडलं महागात
Image Credit source: Google
| Updated on: Nov 08, 2022 | 3:09 PM

नाशिक : नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा फटका पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांनाही बसल्याची घटना समोर आली आहे. ठाणे येथील एक कुटुंब नाशिकला पर्यटनासाठी आलेले असतांना बोटॅनिकल गार्डन बघायला गेले होते. बोटॅनिकल गार्डन बघून बाहेर येताच त्यांना बोटॅनिकल गार्डन बघायला जाणं चांगलंच महागात पडलं लक्षात आले आहे. स्वप्नील विजय बोरसे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन ही घटना उघडकीस आली आहे. बोरसे यांचे संपूर्ण कुटुंब नाशिकमध्ये पर्यटनासाठी आले होते. त्या दरम्यान बोटॅनिकल गार्डन बघायला गेले होते. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असतांना विल्होळी परिसरात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून बोटॅनिकल गार्डन उभारण्यात आले होते. स्वतः रतन टाटा यांनी बोटॅनिकल गार्डनचे उद्घाटन केले होते. त्यामुळे नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनची अनेकांना भुरळ पडत आहे. त्याच दृष्टीने बघायला आलेल्या ठाणेकर कुटुंबाला नाशिकच्या चोरट्यांचा फटका बसला आहे.

नाशिक शहरात मनसेची सत्ता असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या विकास भर टाकत असतांना बोटॅनिकल गार्डन उभारण्यात आले होते.

बोटॅनिकल गार्डनची कलाकृती जगभरात पर्यटकांना भुरळ घालणारी असून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येकाला ते बघावेसे वाटते.

अशीच भुरळ नाशिकला पर्यटनासाठी आलेल्या ठाण्यातील बोरसे कुटुंबाला पडली होती. त्यानुसार त्यांनी बोटॅनिकल गार्डनमध्ये जात असतांना गाडीतच मौल्यवान वस्तु ठेवल्या होत्या.

बोटॅनिकल गार्डनच्या बाहेर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल, आयपॅड असा सुमारे ९१ हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

या चोरी प्रकरणी ठाण्याचे रहिवासी स्वप्नील विजय बोरसे यांनी तक्रार दाखल केली असून बोरसे कुटुंबाला पर्यटन करणे महागात पडले आहे.

बोटॅनिकल गार्डनमध्ये जात असतांना बोरसे कुटुंबाने मागील बाजूला पर्समध्ये ह्या सर्व वस्तु ठेवल्या होत्या, बोरसे कुटुंब बोटॅनिकल गार्डनमध्ये जाताच चोरट्यांना हा डल्ला मारला आहे.