
Crime News : जगभरात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. ज्यामुळे गुन्हेगारांचे वेग-वेगळे चेहरे सर्वांसमोर येत असतात… पण आता तर लेकीसाठी बापच मोठी हैवान ठरला आहे. ज्याने पोटच्या लेकीला तब्बल 24 वर्ष बेसमेंटमध्ये कैद केलं आणि तिच्या सतत बलात्कार करत राहिला… हे 24 वर्ष त्या मुलीसाठी नरका समान होते… अशात हे सत्य समोर आलं तरी कसं असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल… बापाच्या तावडीतून लेकी कशी सुटका झाली आणि आता ती कसं आयुष्या जगत आहे… याची माहिती देखील समोर आली आहे.
ही धक्कादायक घटना ऑस्ट्रिया येथे राहणारा नराधम जोसेफ फ्रिट्जल(Joseph Fritzl) याची आहे. ज्याने स्वतःचीच लेक एलझाबेथ फ्रिट्जल (Elisabeth Fritzl) हिला तब्बल 24 वर्ष घराच्या बेसमेंटमध्ये ठेवलं आणि तिच्यावर सतत बलात्कार करत राहिला… या दरम्यान, एलझाबेथ हिने सात मुलांचा जन्म दिला.
जोसेफ याने स्वतःच्या मुलीला 18 वर्षापासून 42 वर्षापर्यंत घरातील बेसमेंटमध्ये कैद केलं… त्यानंतर त्याने हजारवेळी लेकीवर बलात्कार केला… ज्यामुळे एलझाबेथ हिने स्वतःच्या बापाच्या 7 मुलांना जन्म दिला… जोसेफ याने एलझाबेथ हिच्या तीन मुलांना तिच्यासोबत त्याच बेसमेंटमध्ये ठेवलं… एका मुलाचा तर जन्मानंतर मृत्यू झाला… तर अन्य तीन मुलांना जोसेफ याने स्वतःसोबत घरात ठेवल आणि लोकांना सांगितलं की, माझ्या दारात कोणी मुलांना सोडून गेलं…
एलिझाबेथला कैद करण्यापूर्वी जोसेफने घर आणि बागेखाली एक तळघर बांधण्यास सुरुवात केली. त्याने 18 वर्षांची मुलगी एलिझाबेथ हिला शेवटचा दरवाजा बसवण्यास मदत करण्यास सांगितलं. ती बेसमेंट जवळ येताच, जोसेफने तिच्या तोंडावर इथरने भिजवलेला कापड लावला आणि तिला तळघरात बंद केलं. एलिझाबेथ यापूर्वी एकदा घरातून पळून गेली होती आणि तिच्या आईने बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. हेच कारण होतं की, लोकांना देखील संशय आला नाही.. त्याने लोकांना सांगितलं, त्याची मुलगी धार्मिक संघटनेत सामील होण्यासाठी पळून गेली आहे.
2008 मध्ये, एलिझाबेथची 19 वर्षांची मुलगी कर्स्टन गंभीर आजारी पडली. जोसेफ तिला रुग्णालयात घेऊन गेला आणि डॉक्टरांना तिच्या प्रकृतीबद्दल शंका आली. त्यांनी पोलिसांना बोलावलं. जेव्हा पोलिस आले आणि त्यांनी मुलीच्या आईला बोलावले तेव्हा जोसेफला एलिझाबेथला बाहेर काढावं लागलं. त्याने तिला खोटे बोलण्यास भाग पाडलं आणि पोलिसांकडे नेलं. जोसेफ याने मुलांना जीवे मारण्याची धमकी दिलेली…
अपराधीला शिक्षा होईल असं म्हटल्यानंतर एलिझाबेथ हिने देखील बोलण्यास सुरुवात केली… 24 वर्षांत पहिल्यांदाच तिने आणि तिच्या मुलीने सूर्यप्रकाश पाहिला हे ऐकून पोलिसांना आश्चर्य वाटलं. त्यानंतर जोसेफला पकडण्यात आले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तो अजूनही तुरुंगात आहे.
रिपोर्टनुसार, आता एलिझाबेथ तिच्या सहा मुलांसोबत ऑस्ट्रियन ग्रामीण भागातील एका अज्ञात गावात राहते. एका रिपोर्टनुसार, 2009 मध्ये, कैदेतून सुटल्यानंतर एका वर्षानंतर, एलिझाबेथ थॉमस वॅग्नर नावाच्या माणसाच्या प्रेमात पडली आणि आता तो देखील आता तिच्यासोबत राहतो.