
पाटणा : राज्यातील भागलपूर (Bhagalpur) परिसरातील एका शिक्षकाने (Teacher) चार वर्षापूर्वी तरुणीवरती बलात्कार केला होता. त्या शिक्षिकाने शिक्षेच्या भीतीने चक्क कोर्टाची फसवणूक केल्याचं निर्दशनास आलं आहे. स्वत:चं अंत्यसंस्कार केल्याचा फोटो कोर्टात (Court) सादर केला होता. इशीपुर बाराहाट पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 14 ऑक्टोबर 2018 रोजी हा गुन्हा दाखल झाला होता.
सोमवारी कोर्टाकडून चौदा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, त्याचबरोबर एक लाख रुपये दंड सुध्दा ठोठावण्यात आला आहे. कोर्टात दंड नाही भरला, तर अजून सहा महिन्याची शिक्षा भोगावी लागेल असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्या शिक्षकाचं नाव नीरज मोदी असं आहे.
ज्यावेळी बलात्कार झाल्याचं मुलीने घरी सांगितलं. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर शिक्षेच्या भीतीने शिक्षकाने वडिलांची मदत घेऊन अंत्यसंस्कार केल्याचा फोटो कोर्टात सादर केला. स्मशान भूमीतील कर्मचाऱ्यांकडून खोटा मृत्यूचा दाखल सुध्दा घेतला. हे सगळं कोर्टात सादर केलं, त्यानंतर ही केस संपली होती.
त्यानंतर हा आरोपी खुलेआम गावात फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी कोर्टात सगळे पुरावे सादर केले. त्यानंतर शिक्षकाला हजर न्यायालयात हजर करण्यात आलं.