लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्यासोबत बागेत हिंडत होती, नंतर दोन्ही कुटुंबाला किंमत चुकवावी लागली, तरुणीचे प्रताप वाचाच

Crime News: पश्चिम बंगालमधील एका जोडप्यानी बरदहा पोलिस स्थानकामध्ये एक आगळी वेगळी तक्रार नोंदवली होती. तक्रारीमध्ये असे होते की, एका तरूणीचे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या लग्नाला त्यांच्या समाजाचा विरोध होता. त्या समाजातील लोकांनी त्यांना एकत्र मारहाण केली होती.

लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्यासोबत बागेत हिंडत होती, नंतर दोन्ही कुटुंबाला किंमत चुकवावी लागली, तरुणीचे प्रताप वाचाच
प्रतिकात्मक छायाचित्र
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 18, 2025 | 3:10 PM

असे म्हटले जाते की, या समाजामध्ये राहाताना त्यांनी आखलेल्या काही चालीरीतींचे आणि परंपरांचे पानल करणे महत्त्वाचे असते. त्यांच्या विरोधात काही कार्य केल्यास तुमच्या चारित्र्यावर किंवा तुमच्या घरच्यांच्या इज्जतीवर प्रश्न उपस्थित केले जातात आणि समाजामध्ये एकदा तुमची इज्जत गेली तर तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. अशीच एक घटना एका मुलीसोबत घडली आहे. नॉर्थ 24 परगनामधील बरदाहाच्या एका मुलीकडून आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून खुप मोठी चुक झाली होती ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला समाजाच्या अनेक प्रश्नांना सामोरं जावे लागले. मुलगी आणि तिचा होणारा नवरा त्यांच्या एकमेकांबद्दलच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी एकत्र वेळ घालवण्यासाठी बाहेर भेटतात.

लग्नापूर्वी एकमेकांचे विचार जाणून घेण्यासाठी एकत्र वेळ घालवायता प्लॅन करतात. दोघेही लग्नापूर्वी दोघेही एकमेकांना जाणून घेण्यासाठी चांगले मित्र होतात. आजकाल लग्न होण्यापूर्वी एकमेकांना भेटमे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातल्या त्यात जर अरेंज मॅरेज असेल तर जोडीदाराच्या मनामध्ये नेमकं काय भावना आहेत या गोष्टी जाणून घेणे गरजेचे असते. परंतु ज्या ठिकाणी हे दोघे राहातात त्या जागी लग्नची बोलनी करण्यापूर्वी तिथे असलेल्या क्लबची परवाणगी घेणे महत्त्वाचे असते.

सादर जोडप्यांच्या घरच्यांनी त्यांचे लग्न ठरवण्यापूर्वी क्लबची परवाणगी घेतली नाही. या गोष्टीचा परिणार त्या जोडप्याला आणि त्यांच्या घरच्यांना भोगावा लागला आहे. एकदा हे जोडप फिरताना काही लोकांनी त्यांना एकत्र पाहिले आणि तिथे त्यांना बेदाम मारहाण करण्यात आली. जोडप्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. असर अली उर्फ ​​मोहम्मद अझरुद्दीन हा व्यवसायाने फुटबॉलपटू आहे. शनिवारी संध्याकाळी खरदाह येथील एका स्थानिक क्लबच्या सदस्यांनी त्याच्या मैत्रिणीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. लग्नाची तारीख आधीच निश्चित झाली असली तरी क्लब सदस्यांनी या जोडप्याचे नाते नाकारले. असे म्हटले जाते की या भागातील तरुण जोडप्यांना नातेसंबंध आणि लग्नासाठी क्लबची परवानगी घेणे अपेक्षित आहे. ही एक आगळी वेगळी परंपरा आहे. दोन्ही कुटुंबांनी राहारा पोलिस ठाण्यात क्लब सदस्यांविरुद्ध तक्रार दाखल केली, ज्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश होता. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांचा असा विश्वास आहे की हे नैतिक पोलिसिंगचे प्रकरण आहे.

सादर घटना दोपेरिया परिसरात घडली, जिथे पीडिता आणि आरोपी राहतात. अली हा सोदेपूर-खरदाह परिसरातील एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. तो आणि त्याची मैत्रीण तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि ईदच्या दोन दिवसांनी ते लग्न करणार आहेत. वृत्तानुसार, स्थानिक तृणमूल ब्लॉक अध्यक्ष शुकुर अली यांनी टिप्पणी केली की या जोडप्याच्या सार्वजनिक वर्तनामुळे स्थानिक लोक नाराज आहेत आणि कायदा आपले काम करेल. भाजप नेते जॉय साहा यांनी या कार्यक्रमावर टीका केली आणि प्रश्न उपस्थित केला की हा क्लब लोकांच्या कृती आणि निवडींवर नियंत्रण ठेवेल का.