IT Raid : तळघरात 600 लॉकर्स, 3 कोटी रकमेसह दागिने हस्तगत, नोएडातील माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरात सापडले घबाड

| Updated on: Feb 01, 2022 | 10:16 PM

गेले तीन दिवस आयकर विभागाची टीम सिंग यांच्या बंगल्यात तळ ठोकून बसलेय. गेल्या पाच वर्षापासून या सेफ्टी व्हॉल्टमध्ये लॉकर भाड्याने देण्याचे काम केले जात असून उत्तर प्रदेशमध्ये उच्च पदावर तैनात असलेले आणखी एका माजी आयपीएस लॉकरही येथे सापडले आहे.

IT Raid : तळघरात 600 लॉकर्स, 3 कोटी रकमेसह दागिने हस्तगत, नोएडातील माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरात सापडले घबाड
युनिकॉर्न स्टार्ट-अप समूहावर छापेमारी
Follow us on

नोएडा : नोएडात एका माजी आयपीएस अधिकाऱ्या(Ex Ips Officer)च्या घरावर छापेमारी(Raid) करीत आयकर विभागाने कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत. यूपी कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी आर एन सिंग यांच्या नोएडातील घरावर गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. या छापेमारीत आयकर विभागाला तळघरातील 600 लॉकर आढळले आहेत. आयकर विभाग या लॉकर्सची चौकशी करीत आहे. नोएडा सेक्टर 50 मधील बंगला क्रमांक ए-6 मध्ये सिंग यांचे कुटुंब राहते. या बंगल्याच्या तळघरात राम नारायण सिंह यांची पत्नी आणि मुलगा मनसम वॉलेटच्या नावाने लॉकर भाड्याने घेतात. सिंग हे 1983 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते यूपीचे डीजी प्रोसिक्युशन होते. (Former IPS officer’s house raided in Noida, Rs 3 crore seized)

अधिकाऱ्याची पत्नी व मुलगा लॉकर भाड्याने देतात

गेले तीन दिवस आयकर विभागाची टीम सिंग यांच्या बंगल्यात तळ ठोकून बसलेय. गेल्या पाच वर्षापासून या सेफ्टी व्हॉल्टमध्ये लॉकर भाड्याने देण्याचे काम केले जात असून उत्तर प्रदेशमध्ये उच्च पदावर तैनात असलेले आणखी एका माजी आयपीएस लॉकरही येथे सापडले आहे. हे त्यांचे वडिलोपार्जित काम असल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. ‘माझा मुलगा बँकांप्रमाणे लॉकर भाड्याने देतो, यामध्ये बँकांपेक्षा जास्त सुविधा दिल्या जातात, यामध्ये आमच्याकडे दोन खासगी लॉकर्स आहेत. जवळपास सर्व लॉकर्स तपासले आहेत. आमच्याकडे सर्व तपशील आहेत. आमच्याकडे संपूर्ण कागदपत्रे आहेत, असा दावा सिंग यांनी केला आहे. आयकरचा छापा पडला तेव्हा सिंग हे त्यांच्या गावी होते. घरी आयकर विभागाची टीम छापेमारीसाठी पोहचल्याचे कळताच ते तात्काळ नोएडातील घरी दाखल झाले.

या लॉकरमध्ये बेनामी रक्कम असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयटीचा छापा

या लॉकरपैकी एका लॉकरमध्ये बेनामी 20 लाखाची रक्कम असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. यानंतर आयकर विभागाने या लॉकरची तपासणी करण्यासाठी येथे गेल्या तीन दिवसापासून छापेमारी सुरु केली. आतापर्यंत 3 ते 4 बेनामी लॉकर्स कटरने कापण्यात आले आहेत. या लॉकर्समध्ये 3 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, त्यापैकी एका लॉकरमधून सुमारे 2.5 कोटी रुपये आणि उर्वरित 3 लॉकरमधून 30 ते 40 लाख रुपये सापडले आहेत. आणखी काही बेनामी लॉकर्स उघडण्याचे काम सुरू आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार रोख रकमेव्यतिरिक्त अनेक लॉकरमध्ये दागिनेही सापडले आहेत. तपासादरम्यान या लॉकर्सच्या देखभालीमध्येही काही गैरप्रकार आढळून आले आहेत. (Former IPS officer’s house raided in Noida, Rs 3 crore seized)

इतर बातम्या

Twitter : ट्विटरला भारतातून गाशा गुंडाळावा लागणार; आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने घेतली कठोर भूमिका

Pimpri chinchawad crime | आता बोला ! पिंपरीत क्रिप्टोकरन्सी नादापायी पोलिस कर्मचाऱ्याने केलं तरुणाच अपहरण…