चित्रपटात काम न मिळाल्याने चार नवोदित अभिनेत्री वेश्या व्यवसायात, पोलिसांनी केले हायप्रोफाईल रॅकेट उद्धवस्त

पोलिसांची धाड पडल्यावर चारही अभिनेत्रींनी आपले तोंड लपवायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांची ओळख गुप्त ठेवली आहे. त्यांना दलालाच्या तावडीतून मुक्त करण्यात आले असून देवनार येथील सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

चित्रपटात काम न मिळाल्याने चार नवोदित अभिनेत्री वेश्या व्यवसायात, पोलिसांनी केले हायप्रोफाईल रॅकेट उद्धवस्त
| Updated on: Mar 15, 2025 | 9:36 PM

मुंबईतील पवई येथील हिरानंदानी परिसरातील एका हॉटेल्सवर छापा टाकून पोलिसांच्या समाजसेवा शाखेने हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे. या ठिकाणाहून चार नवोदित अभिनेत्रींचा सुटका करण्यात आली आहे.तर या तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या एका ६० वर्षांच्या दलालाला अटक करण्यात आली आहे. या चारही तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

पवईतील उच्चभ्रुवस्तीत वेश्याव्यवसाय चालत असल्याची गुप्त माहीती पोलिसांना मिळाली होती. या माहीतीच्या आधारे पोलिसांच्या समाजसेवा शाखेने बोगस ग्राहक पाठवून खातरजमा केली त्यानंतर पवईच्या एका हॉटेलवर छापा टाकून दलाल शाम सुंदर अरोरा (६० ) याला अटक केली आहे. त्याच्या कुंटणखान्यातून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या तरुणी २६ ते ३५ वयोगटातील आहेत. या हॉटेलमधील रुममधून आठ महागडे मोबाईल, रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच या महिलांशी चौकशी केली जात आहे.

या नवोदित अभिनेत्री स्ट्रगल करीत होत्या. त्यांना चित्रपटात काम मिळत नव्हते. त्यामुळे त्या या धंद्यात ओढल्या गेल्याचे म्हटले जात आहे. या तरुणी बॉलीवूडमध्ये नशीब आजमावयाला आल्या होत्या. परंतू काम मिळेनासे झाल्यानंतर पैशाच्या तंगीमुळे त्यांनी शॉर्टकट मार्गाने पैसा कमविण्यासाठी या तरुणी या शरीर विक्रयच्या धंद्यात उतरल्याचे सांगितले जात आहे.

एकीने हिंदी मालिकांत काम केले आहे

पोलिसांनी शुक्रवारी जेव्हा हॉटेलवर छापा टाकला तेव्हा चारही नवोदित अभिनेत्री हॉटेलमध्ये उपस्थित होत्या. पोलिसांना पाहून त्या थरथर कापू लागल्या आणि रडू लागल्या. यापैकी एका अभिनेत्रीने हिंदी टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले आहे.