प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे एफबी अकाऊंट हॅक,अश्लील साहित्य प्रसिद्ध होतंय…सायबर खातेही हतबल
विष्णू मनोहर यांचे पाककले संदर्भातील फेसबुकवरील अकाऊंट कोणीतरी सायबर भामट्याने हॅक करुन त्यावरुन अश्लील पोस्ट प्रसारीत केल्या जात आहेत,त्यामुळे त्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे....

नागपूरचे प्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर यांच्या पाककलेच्या रेसिपी अगदी घराघरात पोहचल्या आहेत. मात्र, त्याचे फेसबुकवरील खाते कोणीतरी हॅक केले असून त्याद्वारे अश्लिल पोस्ट प्रसारित होत आहेत.त्यामुळे त्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी या संदर्भात सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र तरीही त्यांचे खाते रिकव्हर न झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे नाव अगदी साता समुद्रपार पोहोचले आहे.मात्र त्यांचा नावाने सुरु असणाऱ्या ‘मास्टर रेसिपी बाय विष्णू मनोहर’ या फेसबुक अकाऊंटला कोणीतर हॅक करून त्यावर आता अश्लील पोस्ट केल्या जात असल्याचे धक्कादायक कृत्य उघडकीस आले आहे. या संदर्भात विष्णू मनोहर यांनी सायबर पोलिसांना तक्रार सुद्धा केली आहे.मात्र दहा ते बारा दिवस लोटूनही अद्यापही अकाऊंट रिकव्हर करण्यात यश न आल्यामुळे त्या पोस्ट कायम सुरू असल्याने नाहक मनस्तापाला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.




नाहक मानसिक त्रास
या संदर्भात त्यांनी नागपूर, बंगळुरु, मुंबई, पुणे, तसेच अमेरिकेमध्ये त्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात मेटा सोबतही संपर्क साधण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत अकाऊंट रिकव्हर होऊ शकले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. या अकाऊंटवर 2000 रेसिपी टाकलेल्या आहेत आणि लाखो फॉलोअर्स आहेत. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये फॉलोवरची संख्या घटत चालली आहे. त्या पेजला अनेकजण सोडून जात आहे शिवाय अनेक लोक विष्णू मनोहर यांना फोनद्वारे आणि मेसेजद्वारे संदेश पोहोचवत आहे अशा पद्धतीचे अश्लील पोस्ट का करतात असे प्रश्न आपल्याला विचारत आहेत असे शेफ विष्णू मनोहर यांनी म्हटले आहे. या लिंकवर क्लिक केल्यास युजर्सचे अकाऊंट हॅक होऊ शकते.त्यामुळे या अकाऊंटच्या लिंकला चुकूनही क्लिक करू नये असे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे.