
किरकोळ वादातून शतपावली करत असलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहीसर येथे घडली आहे. या प्रकरणात चार तरुणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी सुरु आहे.
या प्रकरणातील फियार्दी दीपक रमेश गौड हे त्यांच्या घराजवळ दहीसर येथे शतपावली करत होते. येथील सुमित स्नॅक्स दुकानाजवळ रोशन मानकर आणि त्याचे तीन साथीदार मद्यपान करीत बसले होते. यावेळी रमेश गौड यांनी लग्नाची व्हिडीओ कॅसेट परत केव्हा देणार याची विचारणा त्यांना केली. त्यावरुन त्यांच्यात मोठा वाद झाला आणि चौघांनी मिळून दीपकला शिवीगाळ केली आणि जबर मारहाण केली.
दीपक गौड हे त्यांच्या घराजवळ शतपावली करत होते. त्यावेळी त्यांचे चौघे मित्र तेथे बिअर पित बसले होते. यावेळी दीपक याने त्याची लग्नाची व्हिडीओ कॅसेट कधी देणार अशी विचारणा रोशन मानकर याला केली. त्याचा राग आल्याने रोशन याने दीपकला शिवीगाळ केली. त्यानंतर रोशन यानेही शिवीगाळ केली. यातून शब्दाला शब्द वाढत गेला आणि या चौघांनी मिळून दीपक याला बेदम मारहाण केली. या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या चौघांनी बिअर पिताना फियार्दीने दीपक गौड याने व्हिडीओ कॅसेटसंदर्भात विचारणा केल्याने या चौघांना राग आला. त्यानंतर त्यांच्या वादावादी झाली. यानंतर फिर्यादी दीपक गौड याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडण्यात आली. एवढे करुनही हे चौघे जण थांबले नाहीत. त्यांनी या बिअरच्या फुटलेल्या बाटलीच्या काचेने दीपक याच्या चेहऱ्यावरुन गळ्यापर्यंत वार करुन त्याला गंभीर जखमी केले.या फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा या चौघांवर दाखल झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात पसार झालेल्या मयुरेश अजय सुर्वे (21) ,रोशन अमित मानकर (24),यश नरेंद्र पालांडे (22) ,जय गुलाब लोखंडे (22) या चारही आरोपींना अटक करुन पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.दहिसर परिसरात घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे स्थानिकांमध्येही चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून गुन्हा उघडकीस आणला आहे.