
Crime news | 28 ऑगस्ट 2023 : हरियाणातील सोनीपत येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तेथे अवघ्या तीन महिन्यांच्या मुलीची हत्या करण्यात (crime) आली आहे. आणि हे क्रूर कृत्य करणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्याच बालिकेची आजी आहे. त्या महिलेने तिच्या अवघ्या तीन महिन्यांच्या नातीला जमिनीवर आपटून तिची हत्या (crime news) केली. आरोपी महिलेचा मुलावर राग होता, त्यातून बराच काळ त्यांचे भांडणही सुरू होते. त्याच रागातून तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनीपतच्या भदाना येथे राहणाऱ्या राजेंद्र या इसमाने दिल्लीतील एका महिलेशी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्यावर नाराज होते. हा वाद एवढा वाढला की त्या आरोपी महिलेने प्रथम सुनेशी भांडण केले आणि नंतर तिच्या अवघ्या तीन महिन्यांच्या मुलीला जमिनूवर आपटून-आपटून तिची हत्या केली.
याप्रकरणी त्या मुलीचे वडील राजेंद्र यांच्या सांगण्यानुसार, त्याच्या आईनेच निष्पाप मुलीची हत्या केली. राजेंद्रने सांगितले की, त्याने दिल्लीतील एका महिलेशी लग्न केले. ज्यामुळे त्याची आई चिडली होती आणि पत्नीला नेहमी दोष द्यायची. तो काही दिवसांसाठी घरी आला होता, तेव्हा वीजेचे काम करण्यासाठी वरच्या खोलीत गेला होता. तेव्हा त्याच्या भावाने त्याला पकडून ठेवले आणि त्याच्या वडिलांनी पत्नीला धरू ठेवले. नंतर त्याच्या आईने त्याच्या लहानग्या मुलीला जमिनीवर आपटून तिची हत्या केली.
याप्रकरणी राजेंद्र याच्या तक्रारीनंतर त्याची आई, वडील आणि भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.