मित्राची डेडबॉडी कड्यावरून टाकण्याच्या प्रयत्नात त्याचाच तोल गेला, अंबोली घाट बनलाय डेडबॉडी डम्पिंग यार्ड

| Updated on: Feb 02, 2023 | 8:43 PM

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो त्याच्या एका मित्रासोबत सावंतवाडीतील आंबोली घाटात आला. मृतदेह अंबोली घाटात ढकलत असतानाच मृतदेहासह तोही कड्यावरून दीडशे फूट दरीत कोसळला.

मित्राची डेडबॉडी कड्यावरून टाकण्याच्या प्रयत्नात त्याचाच तोल गेला, अंबोली घाट बनलाय डेडबॉडी डम्पिंग यार्ड
Amboli-ghat
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : जो दुसऱ्याची कबर खणतो तो एक दिवस स्वत:च त्या खड्ड्यात कोसळतो, जशास तसे, अशा म्हणी खऱ्या ठरविणारी घटना (  sawantwadi  )  सावंतवाडीजवळील आंबोली घाटात घडली आहे. एका त्रिकूटाकडून त्यांच्याच मित्राची पैशाच्या घेवाण देवाणी चुकून हत्या झाली. मग हे पाप  लपविण्यासाठी त्या दोघा जणांनी मित्राचा मृतदेह चारशे किलोमीटर दूर आपल्या कारमध्ये घालून नेला खरा, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत. हा मृतदेह आंबोलीच्या ( AmboliGhat ) कड्यावरून ढकलताना त्यापैकी एकाचा पाय घसरला आणि तोही मृतदेहासकट कड्यावरून कोसळून  मृत्यू पावल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मृतदेहाना काढताना पोलीस पथकाला मोठी कसरत करावी लागली. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

भाऊ साहेब माने आणि त्याचा मित्र तुषार पवार २८ या दोघांच्या होतून रविवारी त्यांचा मित्र सुशांत खिलारे याची पैशांवरून हमरीतुमरी होत चुकून हत्या झाली. हे तिघे मित्र सातारा जिल्ह्यातील क-हाडचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडून सुशांतची हत्या झाल्याने मृतदेह नष्ट करण्यासाठी ते साताराहून चारशे किलोमीटर दूरवर असलेल्या आंबोली घाटात कारमधून त्याची डेडबॉडी घेऊन आले.

त्यानंतर त्यांनी सुशांत खिलारेचा मृतदेह कसाबसा उचलून वरपर्यंत कड्यापर्यंत नेला खरा परंतू माने याचा तोल जाऊन तो त्याच्या मित्राच्या डेड बॉडीसह उंच कड्यावरून थेट दरीतच कोसळला. इतक्या उंचावरून कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी माने सोबत असलेला त्याचा मित्र पवार मात्र बचावला परंतू त्याला या घटनेचा प्रचंड धक्का बसला. त्यामुळे त्याने जवळच्या मंदिरात जाऊन आपल्या कुटुंबियाजवळ गुन्हा कबुल करीत मदतीसाठी त्यांना बोलावले.

ज्यावेळी स्थानिकांना ज्यावेळी मृतदेह सापडले तेव्हा हा गुन्हा उघडकीस आल्याचे पोलीसांनी सांगितले. मंगळवारी या ठीकाणाहून दीडशे फूट दरीतून एकमेकांपासून दहा फूट अंतरावर कोसळलेले दोघांचे मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतले.

आंबोली घाटात राज्यात सर्वाधिक पाऊस कोसळतो. हे निसर्गरम्य असलेले हे ठिकाण मृतदेह नष्ट करण्यासाठी गेली काही बदनाम झाले असल्याचे सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले.

काही वर्षांपूर्वी येथे आणखी दोन मृतदेह सापडले होते. पर्यटकांच्या मार्गावर येथे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली असून या तिघांच्या कुटुंबियांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे इन्सपेक्टर मेंगडे यांनी टाईम्स बोलताना सांगितले. प्रथमदर्शनी या गुन्ह्याचा हेतू पैशावरून झालेले भांडण असा असल्याचे स्पष्ट होत आहे.