तो डेटींग साईटवरून मुलींचे नंबर मिळवून अश्लील संदेश पाठवायचा, अखेर गेला तुरूंगात

लग्न जुळवाणाऱ्या वेबसाईटवरून मुलींचे मोबाईल क्रमांक मिळवून त्याने त्यांना अश्लील संदेश पाठवण्यास सुरूवात केली होती. त्याला कोणी पसंत करीत नव्हते. त्यामुळे मैत्री करण्यासाठी त्याने हे उद्योग केल्याचे उघडकीस आले आहे.

तो डेटींग साईटवरून मुलींचे नंबर मिळवून अश्लील संदेश पाठवायचा, अखेर गेला तुरूंगात
अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा काढला काटा
Image Credit source: CRIME
| Updated on: Jan 21, 2023 | 3:57 PM

मुंबई : इतर आपल्या मित्रांप्रमाणे आपली ही गर्लफ्रेंड असावी अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने डेटींग साईटवरून मुलींचे नंबर शोधून त्यांना पटविण्यासाठी अश्लिल संदेश पाठवण्यास सुरूवात केली. पण एका 14 वर्षीय मुलीने त्याची तक्रार तिच्या आईकडे केल्याने पोलीसांनी त्याला अखेर अटक करण्यात यश आले. त्याने मेट्रोमोनियल वेबसाईटवर स्वत: चे प्रोफाईलही तयार केले होत. त्याद्वारे मुलींचे संपर्क क्रमांक काढत त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता.

मालाड येथून एका 22 वर्षीय तरूणाला जेरबंद करण्यास यश आले आहे. या आरोपीला मुलीशी मैत्री करायची होती. म्हणून त्याने डेटींग साईट तसेच विवाह जुळविणाऱ्या वेबसाइटवरून या तरूणींच्या प्रोफाईलवरून तरूणीचे क्रमांक मिळवून त्यांच्याशी मैत्री करण्याचे प्रयत्न सुरू केले. एका 14 वर्षीय विद्यार्थीने आपल्या आईला याबाबत सांगितले. त्याने या तरूणीला वारंवार मोबाईल फोन वरून अश्लिल संदेश पाठविण्यास सुरूवात केली. या तरुणी त्याने व्हीडीओ कॉलही केले. तिने त्याला ब्लॉक करीत त्याचे कॉल न उचलता त्याची तक्रार तिच्या आईकडे केली.

स्टूडंटची आईच्या तक्रारी वरून मालाड पोलीसांनी त्याच्यावर आयपीसीचे कलम 454 ( डी ), 509, 506 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 आणि पॉस्को एक्ट (POSCO Act) चे कलम 12 नूसार आरोपीवर केसेस दाखल करीत त्याला अटक केली आहे, हर्ष गिंद्रा असे या तरुणाचे नाव आहे. त्याने मेन्ट्रोमोनियल साईटवरून तसेच डेटींग साईटवरून मुलींचे क्रमांक काढून त्याना फोन करण्यास सुरूवात केल्याचे मालाड पोलीसांनी सांगितले.