ऑनर किलिंग नव्हे हे तर हॉरर किलिंग! घरातल्यांच्या विरोधात जाऊन Love Marriage, मुलीची गोळ्या घालून हत्या

| Updated on: Apr 27, 2022 | 12:53 PM

Honour killing Mainpuri Murder : 20 एप्रिलला या मुलीनं घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं.

ऑनर किलिंग नव्हे हे तर हॉरर किलिंग! घरातल्यांच्या विरोधात जाऊन Love Marriage, मुलीची गोळ्या घालून हत्या
भावानं गोळ्या झाडल्या
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

उत्तर प्रदेश : देशातील ऑनर किलिंगच्या (Honour killing) घटना कधी थांबणार, असा प्रश्न आता उत्तर प्रदेशात घडलेल्या एक थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे पुन्हा उपस्थित झाला आहे. घटना उत्तर प्रदेशच्या (UP crime) मैनपुरीमधली आहे. मैनपुरीच्या कोतवालीमध्ये एक मुलीनं प्रेमविवाह केला. घरातल्यांच्या विरोधात जाऊन केलेला हा प्रेमविवाह (Love marriage) नातलगांना अजिबात पटला नाही. संतापलेल्या नातलगांनी आपल्याच मुलीवर गोळ्या झाडल्या आणि तिचा मुडदा पाडला. नवविवाहित दाम्पत्यावर झाडण्यात आलेल्या आलेल्या गोळ्या मुलीचा तर जागीच मृत्यू झाला आणि नवरा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. घरात घुसून मुलीच्या कुटुंबीयांनी ही हत्या केली. यामध्ये मुलीच्या पतीहीसह त्यांचे कुटुंबीयदेखील जखमी झाले आहेत. सध्या सगळ्याच जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

धक्कादायक घटनेनं खळबळ

ऑनर किलिंगच्या उद्देशानं करण्यात आलेला हा हल्ला पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पथकंही तैनात केली आहे. एकून तीन पथकांच्या मदतीनं फरार मारेकऱ्यांचा शोध घेतला जातो आहे.

आज तकच्या पुष्पेंद्र सिंह यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार 20 एप्रिलला या मुलीनं घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. मुलाचं नाव करण असून मुलीचं नाव कोमल आहे. करणने फारुखाबादच्या कायमगंजमध्ये राहणाऱ्या कोमलसोबत प्रेमविवाह केला होता.

गेल्या वर्षापासून त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं. करणच्या घरातले या लग्नासाठी राजी होते. पण कोमलच्या घरातल्यांचा लग्नाला तीव्र विरोध होता. पण कोमलच्या आईनं आपल्या मुलीच्या लग्नासाठी तिची साथ दिली. कोमलच्या आईनं तिचं लग्न करणशी लावून दिलं.

सासरी असताना घरात घुसून हल्ला

कोमन आपल्या सासरी राहत होती. पुरोहिताना मोहल्ल्या राहणाऱ्या कोमलच्या घरात तिचा भाऊ आणि काका घुसले. घरात घुसताच करण आणि कोमल यांना त्यांनी गोळी मारली. यानंतर घरातल्यांनी गोळी झाडणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यात दोघे जण जखमी झाले. यानंतर कोमलच्या भावानं आणि काकानं घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्यात कोमल जागीच ठार झाली. तर तिचा पती गंभीर जखमी झाला. जखमी करणसोबत त्याची आई पिंकी आणि भाऊ रॉकी हे देखील जखणी झाले. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. या धक्कादायक घटनेनं ऑनर किलिंगच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.