पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, माथेफिरु पतीने जे केले त्यानंतर सर्वच हादरले !

पती-पत्नी दोघे शेतमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. पण पतीच्या मनात नको तो संशय आला आणि या संशयाने भयंकर रुप घेतले.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, माथेफिरु पतीने जे केले त्यानंतर सर्वच हादरले !
चंद्रपूरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीचा पत्नी आणि मुलींवर हल्ला
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 06, 2023 | 1:12 PM

चंद्रपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नी आणि दोन मुलींवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला तर मुली गंभीर जखमी झाली आहे. पोंभुरणा तालुक्यातील डोंगरहळदी येथे आज सकाळी ही घटना घडली. आशा मनोज लेनगुरे असे मयत पत्नीचे नाव आहे. दोन्ही जखमी मुलींवर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी पती मनोज लेनगुरे याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास उमरी पोतदार पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा

आशा लेनुगरे आणि मनोज लेनुगरे दोघेही आपल्या 17 वर्षाच्या आणि 12 वर्षाच्या दोन मुलींसोबत पोंभुरणा तालुक्यातील डोंगरहळदी गावात राहत होते. दोघेही शेतमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मनोजला पत्नी आशाच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून दोघांमध्ये वाद होत होते. अखेर हा वाद विकोपाला गेला आणि पतीने टोकाचे पाऊल उचलले.

वादातून पत्नी आणि मुलींवर हल्ला

पतीने रागाच्या भरात पत्नी आणि दोन मुलींवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या. जखमी मुलींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच उमरी पोतदार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्नीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.