
गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी मुंबई : पती-पत्नीचं भांडण झालं तरी ते एकमेकांसोबत बोलायचे जास्त वेळ राहत नाहीत. (Mumbai Crime) पती आणि पत्नी संसाराच्या गाड्याची चाके दोघेही चालवत असतात. काही गोष्टींवरून वाद होतो आणि दोघेही विभक्त होण्याचा निर्णय घेतात. मात्र अनेकदा असं होतं की पती नशेबाज असेल तर मारहाण करण्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडलेली पाहायला मिळाली आहे. पतीच्या एका नकारानंतर त्याने जे काही कृत्य केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मुंबईतील मालाड(Mumbai Malad Crime News) परिसरातील गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका बेकायदा झोपडीत पती आणि पत्नी राहत होते. गुरूवारी संध्याकाळी महिलेच्या पतीने दारू पिण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र पत्नीने पैसे न दिल्यामुळे त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. (Mumbai Police Marathi News)
या घटनेची माहिती मिळताच बोरिवली जीआरपीने खुनाअंतर्गत गुन्हा दाखल करून अवघ्या 4 तासात आरोपी मोईनुद्दीन अन्सारी याला मालवण (Malvan Crime News) परिसरातून अटक केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी मुंबईतून पळून जाण्याचा कट आखत होता, मात्र तो पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितलं, परवीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे.
दरम्यान, महिला काबाड कष्ट करून पैसे कमवत असायची आणि तिचा पती महिलेकडून पैसे घेऊन दारू प्यायचा, जेव्हा महिला पैसे देत नाही तेव्हा तो तिला मारहाण करायचा. अनेकवेळा त्याने तिला मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितलं.