AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याला हवी होती नोरा फतेहीसारखी फिगर, बायकोसोबत केलं असं काही की…धक्कादायक प्रकार समोर!

अभिनेत्रींच्या सौंदर्याला लाखो तरुण भाळतात. व्यायाम, योग्य आहाराच्या जोरावर अभिनेत्रींनी आकर्षक शरीरयष्टी कमवलेली असते. याच कारणामुळे अनेक तरुण अभिनेत्रींच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतात. दरम्यान, अशाच एका अभिनेत्रीच्या फाजील मोहाचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे.

नवऱ्याला हवी होती नोरा फतेहीसारखी फिगर, बायकोसोबत केलं असं काही की...धक्कादायक प्रकार समोर!
nora fatehi
| Updated on: Aug 21, 2025 | 4:05 PM
Share

Nora Fatehi Like Figure : अभिनेत्रींच्या सौंदर्याला लाखो तरुण भाळतात. व्यायाम, योग्य आहाराच्या जोरावर अभिनेत्रींनी आकर्षक शरीरयष्टी कमवलेली असते. याच कारणामुळे अनेक तरुण अभिनेत्रींच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतात. दरम्यान, अशाच एका अभिनेत्रीच्या फाजील मोहाचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने बायकोची शरीरयष्टी नोरा फतेही या अभिनेत्रीसारखी हवी यासाठी आश्चर्यजनक प्रकार केला.

नवऱ्याला आवडायचं नोरा फतेहीचं शरीर

समोर आलेली ही घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील आहे. गाझियाबाद येथील मुरादनगर येथील रहिवासी असलेल्या महिलेसोबत हा गंभीर प्रकार घडला आहे. या महिलेच्या पतीला नोरा फतेही या अभिनेत्रीची शररीयष्टी आवडायची. आपली बायकोचेही शरीर याच अभिनेत्रीसारखे असायला हवे म्हणून त्याने पीडित महिलेला सलग तीन-तीन तास जीममध्ये व्यायम करायला भाग पाडले आहे.

पत्नीला मारायचा सतत टोमणे

पीडित महिलेचा पती हा शारीरिक शिक्षण देणारा शिक्षक आहे. या महिलेची उंची आणि सौंदर्य एका सामान्य महिलेप्रमाणे आहे. पण ही बाब मात्र तिच्या पतीला आवडली नाही. याच कारणामुळे पती पीडित महिलेला सतत त्रास द्यायचा. टोमणे मारायचा. तसेच मी चुकीच्या मुलीसोबत लग्न केले आहे, असं म्हणून पीडित महिलेला त्रास द्यायचा.

रोत तीन तास जीम करायला लावायचा

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार ‘तुझ्याशी लग्न करून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मला नोरा फतेहीसारखी चांगली, सुंदर मुलगी मिळाली असती,’ असं आरोपी पती त्याच्या पत्नीला सतत म्हणायचा. तसेच पत्नीला रोज तीन तास जीम करायला पाठवायचा. मला तुझी फिगर नोरा फतेहीसारखी हवी आहे, असे म्हणत तिच्यावर दबाव टाकायचा. विशेष म्हणजे पीडित महिलेने एखाद्या दिवशी कमी व्यायाम केला तर तिला त्या दिवशी जेवणही द्यायचा नाही.

लोकांमध्ये संताप, कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अभिनेत्रीप्रमाणे शरीरयष्टी हवी या मोहापाई आरोपी पतीने आपल्या पत्नीला त्रास दिल्यामुळे संताप व्यक्त केला जात असून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.