
हैदराबादमधील एका दाम्पत्याला मोबाइल अॅपवर त्यांच्या सेक्सचे लाइव्ह स्ट्रीमिंग केल्याच्या आरोपाखाली शुक्रवारी अटक करण्यात आली. या दाम्पत्याला पैशांची गरज होती आणि त्यांनी सहज पैसे कमावण्यासाठी असे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दाम्पत्याकडे त्यांच्या दोन मुलींच्या कॉलेजच्या फी भरण्यास पैसे नव्हते. त्यांच्या दोन्ही मुली हुशार विद्यार्थिनी आहेत. त्यापैकी एक बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकते, तर दुसरीने नुकतीच इंटरमीडिएट परीक्षेत 470 पैकी 468 गुण मिळवले असून ती कॉलेज प्रवेशाची तयारी करत आहे. याशिवाय, पोलिसांनी सांगितले की, पती रिक्षा चालक आहे आणि त्याची प्रकृती खराब होती. त्याच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नव्हते.
सेक्स व्हिडीओ कितीला विकले जात होते?
गुरुवारी अंबरपेट येथील मल्लिकार्जुन नगरमधून या पुरुष आणि महिलेला अटक करण्यात आली. त्यांच्या घरातून हाय डेफिनिशन कॅमेरेसह अनेक उपकरणे जप्त करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, हे दाम्पत्य त्यांच्या सेक्सचे लाइव्ह आणि रेकॉर्ड केलेले व्हिडीओ अॅप वापरकर्त्यांसोबत शेअर करत होते. विशेषतः अशा तरुणांना जे अशा व्हिडीओसाठी पैसे देण्यास तयार होते. एका लाइव्ह व्हिडीओची किंमत 2,000 रुपये होती, तर रेकॉर्ड केलेली क्लिप 500 रुपयांना विकली जात होती.
वाचा: महाराज जात पाहून स्कॉलरशिप व नोकऱ्या देता, हे काही बरे नव्हे; किरण मानेची पोस्ट चर्चेत
कसे पकडले गेले?
पोलिसांनी सांगितले की, या रॅकेटद्वारे हे दाम्पत्य रिक्षा चालवून कमावत असलेल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त पैसे कमावत होते. यासाठी त्यांनी एचडी कॅमेऱ्यांचा वापर केला. त्यांनी कथितपणे या कृतीदरम्यान आपली ओळख लपवण्यासाठी मास्क देखील घातले होते. ईस्ट झोन टास्क फोर्सने गुप्त माहितीच्या आधारे दाम्पत्याच्या घरावर छापा टाकला आणि त्यांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. व्हिडीओ खरेदी करणाऱ्यांना देखील नोटिसा जारी करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.