इचलकरंजीत अवैधरित्या गुटखा वाहतूक, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

शिवाजीनगर पोलिसांकडून शेळके मळा ते लिंबू चौक परिसरात गस्त घालण्यात येत होती. यावेळी होंडा सिटी ही गाडी संशयितरित्या जाताना दिसली.

इचलकरंजीत अवैधरित्या गुटखा वाहतूक, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

कोल्हापूर : शिवाजीनगर पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांना अटक केली आहे (Ichalkaranji Police Seized Gutkha). या कारवाईत पोलिसांनी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इचलकरंजी येथे शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे (Ichalkaranji Police Seized Gutkha).

बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणारी मोटार शिवाजीनगर पोलिसांनी पकडली. या प्रकरणी अमोल अरुण लोळगेला (वय 40) अटक केली. शेळके मळा ते लिंबू चौक या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत विविध कंपन्यांचा 2 लाख 19 हजार रुपयांचा गुटखा, मोटार आदींसह सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शिवाजीनगर पोलिसांकडून शेळके मळा ते लिंबू चौक परिसरात गस्त घालण्यात येत होती. यावेळी होंडा सिटी ही गाडी संशयितरित्या जाताना दिसली. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन ही गाडी पकडली. चालक अमोल लोळगेला ताब्यात घेऊन मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा असा मुद्देमाल असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला आरएमडी पानमसाला, विमल पानमसाला, मुसाफिर, कोल्हापूरी पानमसाला असा विविध कंपन्याचा 2 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर 3 लाख रुपयांची होंडा सिटी कार मिळून 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरिक्षक इश्‍वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक प्रमोद मगर, रफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतारी, प्रकाश कांबळे, विजय माळवदे, गजानन बरगाले आदींच्या पथकाने केली.

Ichalkaranji Police Seized Gutkha

संबंधित बातम्या :

बस प्रवासातील ओळखीतून बाळाचं अपहरण, पुण्यातील महिला अवघ्या काही तासात पोलिसांच्या ताब्यात

तरुणाचा मृतदेह डिक्कीत आढळल्याने खळबळ; मित्रानेच पैशांमुळे खून केल्याचा संशय

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI