धक्कादायक, रॅपिडो बाइक ड्रायव्हरच्या बँक खात्यात 331 कोटी कुठून आले? VIP लग्नाला फंडिंग, कोण आहे हा चालक?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाच्या बँक खात्यात 19 ऑगस्ट 2024 ते 16 एप्रिल 2025 दरम्यान एकूण 331.36 कोटी रुपये जमा झाले. तपास यंत्रणेने चालकाने बँक रेकॉर्डमध्ये दिलेल्या पत्त्यावर छापा मारला.

धक्कादायक, रॅपिडो बाइक ड्रायव्हरच्या बँक खात्यात 331 कोटी कुठून आले? VIP लग्नाला फंडिंग, कोण आहे हा चालक?
ED-Rapido
Updated on: Nov 29, 2025 | 8:56 AM

एका बेकायद सट्टेबाजी APP च्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करताना मूळापासून हादरवून सोडणारी माहिती समोर आली आहे. ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. ईडीची टीम एका बाइक-टॅक्सी चालकाच्या दारात जाऊन पोहोचली. मागच्या आठ महिन्यात त्याच्या बॅक खात्यात 331 कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचं आढळून आलं. बाइक-टॅक्सी चालवणाऱ्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम हे धक्कादायक आहे. हा चालक प्रसिद्ध टॅक्सी कंपनीसोबत काम करायचा. बेकायद रक्कमेचा बंदोबस्त करण्यासाठी एका म्यूल खात्याचा वापर केल्याचं हे प्रकरण आहे, हे तपासकर्त्यांनी लगेच शोधून काढलं. ईडी वनएक्सबेट ऑनलाइन सट्टेबाजीशी संबंधित आर्थिक घोटाळ्याचा तपास करताना ईडी या रॅपिडो चालकाच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली. यावर रॅपिडोने काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाच्या बँक खात्यात 19 ऑगस्ट 2024 ते 16 एप्रिल 2025 दरम्यान एकूण 331.36 कोटी रुपये जमा झाले. तपास यंत्रणेने चालकाने बँक रेकॉर्डमध्ये दिलेल्या पत्त्यावर छापा मारला. हा चालक दिल्लीत एका साधारण भागात दोन खोल्यांच्या झोपडीमध्ये राहतो. उपजिवीकेसाठी दिवसभर बाईक चालवतो.

लग्नासाठी किती कोटी खर्च ?

ईडीच्या तपासात हे सुद्धा समोर आलं की, बँक खात्यात जमा असलेल्या रक्कमेतील 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम राजस्थान उदयपूर येथे आयोजित लग्न सोहळ्यासाठी खर्च करण्यात आली. अधिकाऱ्यांनुसार, हे लग्न गुजरातमधील एका युवा नेत्याशी संबंधित होतं. त्याला लवकरच चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.

तो नवरा-नवरीला ओळखत नाही

ईडीने या बाइक ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावलं, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. कारण त्याच्या नावाने कोट्यवधीचा व्यवहार झालेला. कुठल्याही लग्नाशी माझं देणं-घेणं नाही,असं या चालकाने स्पष्ट केलं. तो नवरा-नवरीला ओळखत नाही तसच त्याच्या खात्यात इतके पैसे कसे आले हे सुद्धा त्याला माहित नाही. आता ईडीला संशय आहे की, त्याच्या KYC डिटेल्सची चोरी झाली आहे किंवा कुठल्यातरी रॅकेटने त्याला आमिष देऊन ती मिळवली. त्याच्या नावाने असं बँक अकाऊंट ऑपरेट झालं जे बिलकुल बनावट होतं.

इतक्या सगळ्या पॅन नंबरचा वापर का झाला?

चौकशीत हे सुद्धा समोर आलं की, लग्नाशी संबंधित खर्च लपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. आदित्य जुलाने आपल्या ट्रॅव्हल एजंटला 18 लाखांची कॅश दिलेली. लग्नाची बुकिंग एडजेस्ट करण्यासाठी 17 वेगवेगळ्या पॅन नंबरचा वापर झाला. इतका खर्च होतोय ते कळू नये यासाठी इतक्या सगळ्या पॅन नंबर्सचा वापर झाला. यामागे काम करणारं एक नेटवर्वक आहे. ED ला या संपूर्ण नेटवर्कमध्ये बेटिंग नेटवर्कची लिंक मिळाली. बेटिंग APP मधून आलेला बेकायद पैसा बनावट अकाऊंटमध्ये टाकण्यात आला आणि अनेक मार्गानी वळवून नंतर खर्च करण्यात आला. जेणेकरुन पैशाचा खरा स्त्रोत समजूच नये.