आधी वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी आणि आता थेट जीवंत दुर्मिळ कासव विक्रीला

| Updated on: Sep 23, 2022 | 12:38 PM

अंधश्रद्धेला बळी पडत नरबळीच्या नावाखाली अनेक ठिकाणी आजही वन्य प्राण्यांचा बळी दिला जात असल्याने तस्करी वाढल्याचा वन विभागाला संशय आहे.

आधी वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी आणि आता थेट जीवंत दुर्मिळ कासव विक्रीला
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये वन्य प्राण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे वन विभागाच्या (Forest Department) कारवाईवरुन स्पष्ट होते आहे. नाशिकमध्ये बिबट्याच्या (Leopard) कातडीची (skin) तर सर्रासपने विक्री झाल्याचे आढळून येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धेला बळी पडलेल्या एका कुटुंबाने थेट गिधाडचं घरात टांगून ठेवल्याचे समोर आले होते. त्यात दोन दिवसांपूर्वी बिबट्याची कातडी, चिंकाराचे शिंगे, नीलगाईचे शिंगे विक्री करतांना वनविभागाने छापा टाकला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोच आता नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी थेट दुर्मिळ प्रजातीचे कासव विक्रीला ठेवल्याचे समोर आले आहे. वनविभागाने केलेल्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून वन्य प्राण्यांच्या जिवावर कोण उठलं ? असा संतप्त सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

नाशिक विभागात सातत्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वन्य प्राण्यांच्या तस्करीबद्दल कारवाई होत असल्याने वन्य प्राण्यांच्या जिवावर कोण उठलं आहे ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

अंधश्रद्धेला बळी पडत नरबळीच्या नावाखाली अनेक ठिकाणी आजही वन्य प्राण्यांचा बळी दिला जात असल्याने तस्करी वाढल्याचा वन विभागाला संशय आहे.

दुर्मिळ प्रजातीच्या वन्य प्राण्यांच्या अवयवांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याची बाब समोर येत आहे, पूजेचे साहित्य मिळणाऱ्या दुकानातच वन्य प्राण्यांचे अवयव मिळत असल्याची बाब देखील समोर आली आहे.

नाशिकच्या रामकुंड परिसरात मिळणाऱ्या पूजेचे साहित्य विक्री दुकानात देखील यापूर्वी वन्य प्राण्यांचे अवयव आढळून आल्याने राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चौघांना अटक झाली होती.

आदिवासी भागातील अनेक व्यक्ति या तस्करी प्रकरणात आढळून आल्याचे वनविभागाच्या कारवाईवरुन स्पष्ट होत असून कठोर कारवाई होणेचे गरजेचे आहे.

नुकतीच नाशिकच्या मध्यवर्ती भागात महामार्ग बसस्थानकाच्या समोर असलेल्या बुरहानी फिश अक्वेरियम येथे जाऊन झडती घेतली त्यात दुर्मिळ प्रजातीचे कासव आढळून आल्याने कारवाई करण्यात आली आहे.