Akola Crime : घर आणि शेती नावावर करुन देत नव्हती, मग मुलं आणि पतीने जे केले त्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही !

संपत्तीसाठी कोण कोणत्या थराला जाईल, हे सांगू शकत नाही. पोटच्या मुलांनाही नात्याचा विसर पडल्याच्या घटना घडत आहेत. अकोलामध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे.

Akola Crime : घर आणि शेती नावावर करुन देत नव्हती, मग मुलं आणि पतीने जे केले त्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही !
संपत्तीसाठी स्वतःच्या आईला विष पाजलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 6:05 PM

अकोला / 11 ऑगस्ट 2023 : रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारे संतापजनक कृत्य अकोल्यात घडले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शेती आणि घर नावावर करत नव्हती, म्हणून दोन मुलांनी पित्याच्या मदतीने आईला विष पाजल्याची घटना घडली आहे. महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात दोन्ही मुलं, सुना आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हैसांग येथे ही धक्कादाक घडना घडली. वंदना भिमराव गवई असे पीडित महिलेचे नाव आहे.

काय घडलं नेमकं?

अकोला जिल्हातल्या बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हैसांग येथे वंदना गवई या त्यांच्या नवरा, दोन मुलं आणि सुना यांच्यासोबत राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून वंदना यांचाय कुटुंबीयांसोबत शेती आणि घराच्या जागेवरून वाद सुरू होता. वंदना गवई यांच्याकडे 5 एकर शेती आणि घर आहे. हे दोन्ही वंदना यांच्या नावावर असल्याने ते आपल्या नावावर करून देण्यासाठी वाद सुरु होता.

अखेर हा वाद आता विकोपाला गेला आणि स्वतःच्या दोन मुलांनीच आपल्या आईला आणि नवऱ्याने त्याच्या बायकोला विष वाजून मारण्याचा प्रयत्न केला. या घटेनमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. सुदैवाने वंदना गवई या बचावल्या असून जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. शेती आणि घराच्या छोट्याशा तुकड्यासाठी पोटच्या मुलांनी केले कृत्य पाहून संताप अनावर होत आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.